अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर ची नूतन कार्यकारणी जाहीर.
ग्रामीण बातम्या : पिंपळनेर – येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर ची नूतन कार्यकारणी जाहीर करून ओळखपत्र (आय कार्ड )वितरण सोहळा नुकताच कर्म. आ.मा. पाटील विद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न झाला. अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक आदरणीय श्री. कांतीलालजी जैन साहेब यांच्या शिफारशीवरून अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे दिल्ली येथील केंद्रीय अध्यक्ष मा. श्री. दुवा साहेब यांनी नव्या सन 2023 – 24 ची कार्यकारणी मंडळाला मान्यता दिली.
नूतन कार्यकारणी जाहीर कार्यक्रमाचे अध्यक्ष.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी व पिंपळनेर अपर तहसिलचे तहसीलदार मा.श्री.शेळके साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा.श्री.सचिन साळुंखे साहेब व कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाचे उपाध्यक्ष मा.श्री.सुरेंद्रजी दादा मराठे हे होते.
नूतन कार्यकारणी जाहीर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ओळखपत्र (आयकार्ड)वितरण सोहळा पार पडला. अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर ही संस्था गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून सन – एप्रिल 2023 ते मार्च 2024 साठी नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली.
- अध्यक्ष – श्री. प्रविण थोरात,
- ॲडव्हायझर – श्री. रावसाहेब शिंदे,
- सेक्रेटरी – श्री.प्रमोद जोशी ,
- सेक्रेटरी – श्री.अनिल महाले,
- जॉईन सेक्रेटरी-श्री. भरत बागुल,
- प्रेस सेक्रेटरी – श्री.चंद्रकांत अहिरराव
- ऑर्गनाइज सेक्रेटरी – श्री. पराग महाजन,
- रिपोर्टिंग ऑफिसर -श्री. दिनेश भालेराव ,
- ऑर्गनाईज सेक्रेटरी – श्री.किरण शिनकर,
- ऑफिस सेक्रेटरी- श्री. हंसराजजी शिंदे,
- पब्लिसिटी ऑफिसर – श्री.प्रशांत कापडणीस
- तर उर्वरित जनरल सदस्य म्हणून श्री.सोमनाथ बागुल ,श्री.उमेश गांगुर्डे ,श्री.अरुण गांगुर्डे ,श्री.हितेंद्र चौधरी,श्री. मुकुंद खैरनार ,श्री.योगेश देवरे,श्री. लक्ष्मीकांत अहिरराव,श्री. राजेंद्र एखंडे.
याप्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली व त्यांचे ओळखपत्र (आय कार्ड )देऊन सन्मान करण्यात आला.उपजिल्हाधिकारी व पिंपळनेर अपर तहसीलचे तहसीलदार मा.श्री. शेळके साहेब तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए .पी.आय.मा.श्री.सचिन साळुंखे साहेब यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रविण थोरात यांनी केले ,तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.अनिल महाले यांनी केले. याप्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे पदाधिकारी व सन्माननीय सदस्य तसेच श्री. टाटिया सर ,श्री. कैलास भदाणे, श्री. शरद सोनवणे व श्री. देविदास बर्डे ,हे उपस्थित होते.
अशाच नवनवीन बातम्या-योजना- माहिती -वायरल माहिती जाणून घ्यायचे असल्यास या ग्रुप ला नक्कीच जॉईन व्हा. लिंक .