अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित. | 40 gram sevaks suspended for making strange demands.

भ्रष्टाचाराची चौकशी न करण्यासाठी आंदोलन .40 gram sevaks suspended for making strange demands. | अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित.

भ्रष्टाचाराची चौकशी होणे, गरजेचे मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या विरोधात मनसेने आंदोलन केले होते. परंतु ग्रामसेवकांनी कोणतीही चौकशी करू नये यासाठी आंदोलन केले. त्यामुळे मनसेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या दिला. त्यांनी लगेच आंदोलनाची दखल घेऊन ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत – मॉटीसिंघ जहागीरदार, मनसे जिल्हाध्यक्ष. 

अजब मागणी करणारे ४० ग्रामसेवक निलंबित
40 gram sevaks suspended for making strange demands.ग्रामपंचायतीमधील नांदेड भ्रष्टाचाराची चौकशी न करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणे ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. ही अजब मागणी करणाऱ्या ४० ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेने काढले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मुखेड तालुक्यातील हंगरगा आणि गुंडोपंत दापका या दोन  ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले होते. उलट या विरोधात २० नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी ग्रामसेवकांनी या दोन्ही ग्रामपंचायतीची फेरचौकशी करू नये, गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले निलंबनाचे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी असहकार आंदोलन केले होते. 

दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली.

ग्रामसेवकांनी केलेल्या या अजब मागणीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉटीसिंघ जहागीरदार यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. तसेच आंदोलनात सहभागी दोषी ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. त्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलनात सहभागी ४० ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. 

ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियमाचे भंग केले.

ग्रामपंचायतीची चौकशी न करणे अथवा गटविकास अधिकारी यांचे निलंबनाचे अधिकार रद्द करणे या मागण्या संयुक्तिक नसून त्या प्रशासनाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियमाचे भंग केल्याचे स्पष्ट होते, असे आदेशात नमूद केले आहे.

तसेच आंदोलनात सहभागी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे वेतन नियमानुसार कपात करण्यात यावे असेही आदेशातनमूद आहे. दरम्यान या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

Nanded. ग्रामसेवकांच्या निलंबनासाठी पुन्हा आक्रमक, 38 नाही 63 ग्रामसेवकांना निलंबित करा.

व्हिडीओ पूर्ण पहा… लिंक. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *