पोलीस पाटील जबाबदारी पार पाडण्यास अपयशी. |
पोलीस पाटील नावालाच गावात खुलेआम दारू तर अन जुगाराचे डावही.
तालुक्यातील अनेक गावात अवैध धंदे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे असे असताना पोलिस व महसूल प्रशासनातील प्रतिनिधी म्हणून मिरवणारे गावातील पोलीस पाटील आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडत नसल्याने दिसून येत आहे त्यामुळे गावातील पोलीस पाटील केवळ नावापुरतेच राहिले आहेत.
गावात अवैध धंदे जोरात सुरू.
गावा गावात अवैध धंदे जोरात सुरू आहेत महिला अत्याचाराच्या घटना निगडित घडत आहे आणि गावात अवैधरित्या देशी दारू गुटखा मटका हे व्यवसाय सुरू आहेत या वैद्य धंद्यामुळे नवी पिढी बिघडत आहे.
गावातील पोलीस पाटलांची कामे.
गावात अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती देऊन ते बंद करण्याची प्राथमिक जबाबदारी पोलिस पाटलांची असते परंतु हे निर्भीडपणे त्याची माहिती पोलिसांना देत नाही त्यामुळे हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
पोलीस पाटील यांचे कर्तव्य.
गावात पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन त्यांना मानधन शिवाय सोयी सुविधा देत आहे. असे असताना पोलीस पाटील आपल्या कर्तव्याचा अनेकदा कसूर करताना दिसत आहे.
दारूबंदीसाठी महिलांनाच करावा लागला उठाव.
गावाचे पोलीस पाटील काहीच करत नसल्याने गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांना उठाव करावा लागला परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही.
पोलीस पाटील हे नाव आलाच आहे.
गावात तसेच बाहेरील वाड्या वस्तीवर अवैध दारू व्यवसाय सुरू आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने युवक व्यसनाधीन होत आहे महिला अत्याचारात वाढ होत आहे.पोलीस पाटील हे नाव आलाच आहे गावातील अवैध धंद्याची माहिती देऊन ते बंद करण्यासाठी पोलीस पाटील पुढाकार घेणे गरजेचे होते परंतु असे होत नाही गुलाबराव वायाळ, ग्रामस्थ