अमळनेर इंदौर बसला अपघातात जलसमाधी |
आरोग्यदुत मंगेश चिवटे सरांची तत्परता आणि लगेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना या अपघाताची माहिती देवून सर्व प्रवाशांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेशी संपर्क.
मध्यप्रदेशातील इंदौर हुन 40 प्रवाशांना घेवून येणाऱ्या इंदौर अमळनेर या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झाला असुन खलघाट जवळच्या पुलावरून बस नर्मदा नदीत पडल्याने बसमधील सर्व प्रवासी पाण्यात बुडाले आहेत. या अपघातात चालक वाहकासह 13 प्रवाशांचे मृतदेह मिळाले असुन काही प्रवासी अजून बेपत्ता आहेत. तर जखमींवर धामनोद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली असुन अतिशय दुःखद घटना घडली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच श्री. मंगेश चिवटे सर यांना कळवताच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अपघाताची माहिती दिली. तसेच तेथील जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी म.प्र.मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेशी संपर्क करण्यात येवून घटनेची माहिती घेतली आहे.
माझे मित्र पत्रकार सोनु पटेल व लक्ष्मण दातीर या अपघाताची माहिती तसेच बचाव कार्यात मदत केली असुन नर्मदा पात्रात उर्वरित प्रवाशांचा शोध घेणे सुरू आहे.
अमळनेर इंदौर बसला अपघातात जलसमाधी |
महाराष्ट्रातील सीमालगतचे अनेक बांधव मदतीसाठी तत्परतेने घटनास्थळी व दवाखान्यात पोहचले असुन दुर्घटनाग्रस्त बस काही वेळा पुर्वी वर काढली आहे. सध्या मृतदेहांची ओळख पटवणे सुरू आहे.जिल्हाधिकारी जळगाव यांनी एक पत्र जारी केले आहे
अपघात बसचे चालक वाहक माहिती.
चालक -चंद्रकांत पाटील(18603)
वाहक-प्रकाश चौधरी (8755)
हेल्पलाईन क्रं. -02223023940