अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी द्या! फरार आरोपीबाबत : आदिवासी टायगर सेनेची प्रशासनाकडे मागणी.
शिंदखेडा : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली, या घटनेला तीन दिवस उलटले तरी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी टाइगर सेनेतर्फे तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..
शिंदखेडा तालुक्यातील एका गावातून ५ फेब्रुवारी रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झालेली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात ६ फेब्रुवारी रोजी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी त्याच गावातील एका शेतात मजूर दादर कापणीचे काम करीत असताना, त्यांना शेतात पडलेल्या गोणपाटातून उग्रवास येऊ लागला, त्यांनी गावात धाव घेत पोलिस पाटलांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी शिंदखेडा पोलिसांना माहिती दिली.
शिंदखेडा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले समाजबांधव पोलीस स्टेशनबाहेर उपस्थित होते. पोहचल्यानंतर त्या गोणपाटात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता.
घटनास्थळी पोलिस सोमवारी वाढीव कलमानुसार अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर मृत मुलीच्या वडिलांनी जावयावर संशय व्यक्त केला.
अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला तत्काळ अटक करण्यात यावी, जलद गती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी टाइगर सेनेतर्फे बुधवारी दुपारी १२.१३ वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली.
मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र ठाकरे, दीपक पवार, कृष्णा मालचे, विष्णू पगारे, सुमित माळचे, विजय माळचे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा : पोलिसांविरुद्ध तक्रार कशी करावी
येथून मोर्चा पोलिस स्टेशनव- आला. त्याठिकाणी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. त्यानंत मोर्चाची सांगता झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन हिसे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.