Nucleus Budget Yojana In Marathi : आदिवासी समाज बांधवांसाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी दिल्या सूचना. आदिवासी बांधवांना मिळेल न्यूक्लिअस बजेटअंतर्गत लाभ. आजच अर्ज करण्यसाठी पूर्ण माहिती वाचा.
Nucleus Budget Yojana In Marathi |
धुळे, ता. : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे कार्यक्षेत्रातील धुळे, शिंदखेडा, साक्री व शिरपूर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्यूक्लिअस बजेट योजनेत युवकांना क्रिकेट साहित्य, भजनी मंडळांना भजनी साहित्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
Nucleus Budget Yojana In Marathi :या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी केले आहे.
न्यूक्लिअस बजेट योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत क गटात ५०० युवकांना क्रिकेट खेळण्याकरिता क्रिकेट साहित्य संच, ५०० भजनी मंडळांना धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी भजनी साहित्य देण्यात येणार आहे. या योजनांसाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
Nucleus Budget Yojana Apply Link
न्यूक्लिअस बजेट योजना वाटप करण्याचे ठिकाण / पत्ता
याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे (२४, बडगुजर प्लॉट, राम सर्जिकल हॉस्पिटलशेजारी, ८० फुटी रोड, पारोळा चौफुलीजवळ, धुळे) येथे ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत (रविवार व शासकीय सुटी वगळून) कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील.
न्यूक्लिअस बजेट योजना अर्ज करण्याची मुदत
तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज ५ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्वीकारले जातील, मुदतीनंतर फॉर्मवाटप अथवा फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी अर्ज मागणीसाठी, क्रिकेट टीम योजनेचा लाभ घेण्यासाठी टीमची यादी, भजनी मंडळाची यादी सोबत आणावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
धुळे जिल्ह्याची अधिकृत WhatsApp ग्रूप लिंक
धुळे जिल्ह्याची शासकीय माहिती चा WhatsApp ग्रूप लिंक
Important Links Highlight Topic
Notification (जाहिरात) |
|
Official Website (अधिकृत वेबसाईट) |
|
Join Us On WhatsApp |
|
Join Us On Telegram |
|
Join Us On Facebook |
|
न्यूक्लिअस बजेट योजना अर्ज PDF |
|
न्यूक्लिअस बजेट योजना अर्ज List |
सारांश