शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे “आदिवासी संस्कृती वार्षिक स्नेहसंमेलन” हर्षोत्साहात संपन्न.!
“आदिवासी संस्कृती वार्षिक स्नेहसंमेलन” हर्षोत्साहात संपन्न |
शिरपूर तालुक्यातील कोडीद येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोडीद येथे आज रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
“आदिवासी संस्कृती” या थीमवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडले. ह्या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच कु.आरती प्रकाश पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, सामाजिक कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका शमाताई पावरा, कनवर पावरा, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अर्थे शाळेचे मुख्याध्यापक डी.आर.पाटील, कोडीद शाळेचे मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील सर तसेच सर्व कर्मचारी वृंद व पालक उपस्थित होते.
Related Post : PM Gharkul Scheme
सुरुवातीला सरस्वती माता व आदिवासी कुलदेवत देव मोगरा मातेच्या पूजन करून घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
वसांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीच्या एकूण २३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यात आदिवासी नारी, दिल है हिंदुस्तानी, देश रंगीला रंगीला, जलवा जलवा, रंगली ओडणी, मेरे प्यार वतन, इंडिया वाले, संदेशे आते है, डायवर दिलं वाला, लिंबुडीचा लिंबू, लेजा लेजा, हो पोरी साजूक, चक चक सोन्याचा,तुझ्यासाठी कान्हा, आदी नृत्य तसेच पर्यावरण विषयी नाटक सादर केले.
ह्यावेळी सूत्रसंचालन श्री.आडे सर ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन जितू पावरा सर यांनी मानले.
Related News : sant Rohidas Scheme
ह्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चौधरी सर, जाधव सर, मोरे सर, आडे सर,अधीक्षक शाह सर, अधिशिका भगत मॅडम, सानप सर, राहूल मावची सर, शब्बीर पावरा सर, गोविंद पावरा सर, नितेश आर.पावरा सर,दिपक पावरा सर, रमेश पावरा सर, जितू पावरा सर, तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.