आदिवासी समाजाच्या विकासाविषयी अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न.

आदिवासी समाजाच्या विकासाविषयी अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न.
आदिवासी समाजाच्या विकासाविषयी अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न.


तालुका प्रतिनिधी : दि 25/09/2022 या दिवशी आदिवासी निसर्गपूजक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आदिवासी पारधी विकास फाउंडेशन या संस्थेच्या सर्व मेंबर्सची आदिवासी पारधी समाजाच्या विकासाविषयी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. 

या बैठकीमध्ये आदिवासी पारधी समाजाचा विकास साधण्यासाठी कशा कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागेल  त्या समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी कोण कोणते अडचणी येत आहेत.

त्या अडचणीवर मात करून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्या विषयी सविस्तर चर्चा करून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करण्याची तयारी या संस्थेच्या सर्व सदस्यांनी ठरवले आहे.

आदिवासी निसर्ग पूजक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आदिवासी पारधी विकास फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी पारधी समाज जिथे कुठे असेल जसे की रानामध्ये,डोंगर दऱ्या खोऱ्य मध्ये,रस्त्यावर,पुलाखाली,रेल्वे स्टेशनला,प्लॉट फॉर्म वर  दवाखान्यासमोर, मंदिरासमोर,नदीच्या काठीला जिथे कुठे लेकरं बाळ बाया माणसे वृद्ध मंडळी वास्तव्य करीत असतील.

त्या ठिकाणी जाऊन त्यांचा लेखी स्वरुपात सर्वे करून त्यांना आधार कार्ड,पॅन कार्ड,इलेक्शन कार्ड,राशन कार्ड,लाईट बिल, कास्ट,व्हॅलिडीटी,रहिवासी असे इत्यादी कागदपत्रे काढून देऊन त्यांना शासकीय विविध शासकीय योजने चा लाभ मिळवून देऊन त्यांच्या लेकरांना शिक्षणा च्या प्रवाहामध्ये आणून  त्या लेकरांना राहण्यासाठी होस्टेल शाळा कॉलेज मध्ये ऍडमिशन देण्याचे काम व तसेच एम एस सी आय टी, डी टी पी,टॅली,हार्डवेअर,एमपीएससी, यूपीएससी,एसटीआय, अशा योजनेचा लाभ त्या सुशिक्षित मुलांना करून देणार आहे. 

तसेच अपंग विधवा विधुर परिपक्व अनाथ अशा गरजू लोकांना शासनाच्या योजनेमध्ये बसून त्यांना पगारी चालू करून देऊन अशा विविध योजनेचा लाभ या आदिवासी निसर्ग पूजक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आदिवासी पारधी विकास फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमाने काम करण्याचे ठरवले आहे.

या कार्यक्रमाला आदिवासी निसर्ग पूजक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड एस.पि.पवार ॲड अमोल मुरालकर,ॲड वैभव देशमुख,ॲड विनायक भास्कर पंडित संस्थेचे उपाध्यक्ष गोविंद पवार सचिव ओंकार ढोरे सहसचिव रोशनी पवार कोषाध्यक्ष दशरथ पवार या संस्थेचे सदस्य संतोष पवार शिवा पवार गवळण बाई बाबुराव नरवाडे आदिवासी पारधी विकास फाउंडेशनचे सदस्य माधव भोसले जया क्रांतीच चकोर हरीश गोपीचंद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !