आपण मंदिरात जातांना किती रुपये खर्च करून देवापर्यंत पोहोचतो ?

How much does it cost to reach God?
How much does it cost to reach God?

How much does it cost to reach God? विवेकबुध्दी?

पन्नास रुपयांचे पेढे, पंधरा रुपयांचा नारळ, दहा रुपयांचा हार, एक रुपया चप्पल सांभाळण्याराला आणि पाच रुपये दान पेटीत’ एवढे करुन आपण देवापर्यंत पोहोचतो का? याचा आपण नेहमी विचार करावा. देवापर्यंत तेव्हाच पोहोचू जेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते परमेश्वरीय तत्व जाणवेल.

तेव्हा How much does it cost to reach God?एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल. यावरुन एक कहाणी ऐकलेली आठवली. त्याचा संदर्भ गुरु ग्रंथ साहिबमध्ये येतो. ती कहाणी ऐकली आणि मनावर कायमची प्रभाव ठेवून गेली .

कहाणी आहे राजा रणजीतसिंग  यांची. त्यांची जगज्जेता होण्याची इच्छा होती व तसा त्यांचा पराक्रमही होता. लहोरी जिंकून ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असताना एक जंगल लागले. जंगलात एक म्हातारी जमिनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारीत होती व बोरे पडल्यावर त्याचे ढीग करुन ठेवीत होती. तिला राजेसाहेब जात असल्याची काहींच कल्पना नव्हती. तिचे दगड मारणे चालूच होते.

तेवढ्यात, तिने मारलेला एक दगड रणजीतसिंग यांच्या कपाळावर लागला आणि रक्ताची धार वाहू लागली. सैनिक सतर्क झाले व मारणा-याचा शोध घेऊ लागले.

त्यांना How much does it cost to reach God? दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजांसमोर उभे केले. म्हातारीला परिस्थिती लक्षात आली. ती गयावया करुन म्हणाली, “महाराज आपण इथे असल्याचे मला माहित नव्हते. रोजच्या प्रमाणे मी बोरे गोळा करीत होते. रोज ही बोरे विकून जे पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबांचे उदरभरण होते. मी आपल्याला जाणूनबुजून नाही मारले. मला क्षमा करावी महाराज.” असे म्हणून तिने रणजीतसिंगांचे पाय धरले .

सेनापती व सेना How-much-does-it-cost-to-reach-God? ‘आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज देतील’ याची वाट बघत होते. रणजीतसिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली. ते सेनापतीकडे वळून म्हणाले, “एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली घेऊन या.” थैली आल्यावर ती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सांगितले.

सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले. न राहवून सेनापती महाराजांना म्हणाले, “महाराज, त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायचे सोडून आपण तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज?”

त्यावर महाराज उत्तरले –

“अरे, दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देते तर, रणजीतसिंगाने त्याहून काही कमी देणे शोभले असते का?”

आपल्या जीवनातसुद्धा असे प्रसंग अनेकदा येतात. त्या वेळी आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !