आयटीआयची पहिली यादी २० जुलैला जाहीर १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर होणार प्रवेश. First list of ITI announced.
ग्रामीण बातम्या : ITI राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यंदाही प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या तसेच समुपदेशनसाठी एक अशा पाच फेन्यामध्ये यावर्षी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १३ जुलै रोजी कच्ची यादी जाहीर केली जाणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाअंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे ही प्रवेशाची प्रक्रिया
https://admission.dvet.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. First list of ITI announced.
यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. आयटीआयमध्ये शिकविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांनाकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी ४१८ शासकीय आयटीआय मध्ये ९५ हजार ३८० व ५७४ खासगी आयटीआय ५९ हजार ०१२ अशा १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर प्रवेश होणार आहेत.
पाच फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार
प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करणे : १२ जून ते ११ जुलै
• प्रवेश अर्ज निश्चित करणे १९ जून ते ११ जुलै
● पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जु
- कच्ची गुणवत्ता यादी : १३ जुलै, सकाळी ११ वाजता..
- यादीतील हरकती व बदल करणे : १३ ते १४ जुलै.
- अंतिम गुणवत्ता यादी १६ जुलै. सायंकाळी ५ वाजेपर्यंत
- पहिली प्रवेश फेरी : २० जुलै ५ वाजेपर्यंत
- पहिल्या यादीनुसार प्रवेश २१ ते २५ जुलै
● द्वितीय फेरीसाठी विकल्प सादर करणे २१ ते २५ जुलै
- द्वितीय प्रवेशफेरी – ३१ जुलै, सायं. ५ वाजेपर्यंत
- दुसऱ्या यादीनुसार प्रवेश १ ते ४ ऑगस्ट
● तिसऱ्या फेरीसाठी विकल्प सादर करणे १ ते ४ ऑगस्ट
- तिसरी प्रवेशफेरी ९ ऑगस्ट, सायं. ५ वाजेपर्यंत
- तिसऱ्या फेरीनुसार प्रवेश १० ते १४ ऑगस्ट.
● चौथी फेरीसाठी विकल्प सादर करणे १० ते १४ ऑगस्ट
- चौथी प्रवेश फेरी २० ऑगस्ट, सायं. ५ वाजेपर्यंत .
- चौथी प्रवेश फेरीचे प्रवेश २१ ते २४ ऑगस्ट
- संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर