आयुष्मान भव:” अभियान अंतर्गत, कोडीद येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत शिबिर संपन्न!
आयुष्मान भव: |
आज दिनांक १६ डिसेंबर शनिवार रोजी “आयुष्मान भव:” आरोग्यविषयक विशेष मोहीम राबविणयात आली.
ह्या मोहीम कार्यक्रमाअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत येणारे कोडीद येथे आज रोजी “आयुष्मान भव:” आरोग्यविषयक विशेष मोहीम ह्या कार्यक्रमाअंतर्गत ३० वर्षावरील कोडीद येथील सर्व उपस्थित नागरीकांचे बी.पी तपासणी, शुगर तपासणी, सर्वांचे वजन, उंची करण्यात आली.
संबंधित लेख : आयुष्मान कार्ड कसे काढावे.
आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत आलेले आयुष्मान कार्ड आभाकार्ड वाटप करण्यात आले व आयुष्यमान कार्ड नवीन कार्ड तयार करून देण्यात आले. तसेच ह्यांची सखोल माहिती देण्यात आली ह्या प्रकारे कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची तपासणी व लाभ देण्यात आले व तपासणी करण्यात आली.
शिबिरातील तपासणी केलेल्या लाभार्थ्यांची व संशयित रुग्णांची भविष्यात आपल्या पोर्टलवरील संकलित माहिती प्रशासन शासन दरबारी जमा होईल त्यामुळे जागृत होऊन सर्वांनी सर्वांना ही माहिती देऊन सदर “आयुष्मान भव:” ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी जनजागृती व सर्व घटकातील लोकांपर्यंत हा संदेश देण्यात आले व संदेश देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, आशा सेविका सविता पावरा, अलका पाटील, शकुंतला भील, वंदना पावरा, तारकीबाई पावरा व परिसरातील ग्रामपंचायतीतील नागरिक आदी उपस्थित होते.
ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सर्वांचे आभार मानले.