आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम(RKSK) संपन्न.!

प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत असणारे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम(RKSK) अंतर्गत कार्यक्षेत्रातील मुले – मुली ह्यांना त्यांच्या स्वास्थ्यातील उपदेशासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत मासिक सभा आयोजित करण्यात आली.

आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम(RKSK) संपन्न.!

ह्या कार्यक्रमात आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कार्यक्षेत्रातील किशोरी मुले-मुली ह्यांना त्यांच्या स्वास्थ्याबद्दल सखोल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. बाल्यावस्थेमधुन तारुण्यावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल ह्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप वळवी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीदचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी मुले – मुली व आशा सेविका ह्यांना मार्गदर्शक व समुपदेशन केले उपस्थित आरोग्य सेवक ए.पी. नेटके, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे आशा सेविका उपस्थित होते.

*- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !