नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इ श्रम पोर्टल नोंदणी विषय माहिती देत आहे.: दोन लाखांचा विमा विनामूल्य इ श्रम पोर्टलवर नोंदणी करा. या विमा चे निकष, पात्रता काय आहे, वाचा संपूर्ण माहिती.
हेही वाचा | आयुष्मान भारत कार्ड ची संपूर्ण माहिती वाचा
पुणे : कोरोना काळात केंद्र सरकारला असंघटित कामगारांना आर्थिक मदत करायची होती, मात्र ती करता आली नाही. त्यांची कुठेच, कसलीच नोंदणी होत नव्हती, त्यापासून धडा घेत केंद्र सरकारने देशभरातील असंघटित कामगारांसाठी इ-श्रम पोर्टल सुरू केले. आता त्यावर नोंदणी केली की २ लाख रुपयांचा विमा आपोआप कार्यरत होतो. देशात काही कोटी व एकट्या पुणे जिल्ह्यात या पोर्टलवर तब्बल ६ लाख असंघटित कामगारांची नोंदणी केली गेली आहे.
इ श्रम पोर्टल नोंदणी विनामूल्य
नोंदणीत वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच सरकारच्या सुविधा केंद्रातूनही याची विनामूल्य नोंदणी होती, योजनेचे नियंत्रण केंद्र सरकारकडूनच होत असते. अन्य एखाद्या मंडळात, जसे की इमारत बांधकाम मजूर मंडळात वगैरे नोंदणी झालेली असली तरी संबधित कामगार या पोर्टलवरही नोंदणी करू शकतात. – अभय गीते, कामगार उपायुक्त, पुणे
इ श्रम पोर्टल नोंदणीचे निकष
आता सरकारसमोर देशातील असंघटित कामगारांची माहितीच नाही, असे प्रश्न येणार नाही, बांधकाम मजुरांपासून ते वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारापर्यंत कोणीही यात नोंदणी करू शकते. त्यासाठी एक नवा पैसाही लागत नाही. फक्त वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान हये. उत्पन्न मासिक १५ हजार रुपये हवे. निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी अशी काहीही कपात त्या वेतनात होत नसली पाहिजे.
इ श्रम पोर्टल काय आहे पात्रता .
ही पात्रता असली की सरकारच्या सुविधा केंद्रांवर किंवा कामगार आयुक्त कार्यालयात किंवा मग कोणाच्या साह्याने संकेतस्थळावर । इ-श्रम पोर्टल) जाऊन कोणीही कामगार आपली असंघटित कामगार म्हणून नोंदणी करू शकतो. नाव, पत्ता, काम करत असलेले ठिकाण, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, पत्नी, मुले यांची नावे अशी आवश्यक माहिती या संकेतस्थळावर जमा करावी लागते.
इ श्रम पोर्टल चे आहेत फायदे
अशा आहेत अडचणी योजना केंद्र सरकारची, राज्य सरकारच्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या साह्याने राबवली जाते. मात्र पोर्टलवर केलेली नोंदणी, त्याची माहिती हे सगळेच थेट केंद्र सरकारने यासाठीच नियुक्त केलेल्या विशेष कक्षाकडे जाते. त्यांचे नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात आहेत. सातत्याने याची माहिती घेतली जाते. स्थानिक स्तरावर कामगार आयुक्त कार्यालय हाच एकमेव माहितीचा स्रोत आहे. तसेच नोंदणी ऑनलाइनच करायची सक्ती आहे. कामगारांना ते माहितीच नसते व असले तरी ऑनलाइन नोंदणी करू शकत नाहीत.
हेही वाचा : 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळेल कर्ज Mahila Samriddhi Loan Scheme
इ श्रम पोर्टल इथे होते नोंदणी ?
अशी नोंदणी झाल्यानंतर केंद्र सरकारकडे तुमची माहिती जमा होते हा यातील पहिला फायदा आहे. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे तुमचा अपघातात मृत्यू झाला किया नैसर्गिक मृत्यूही झाला तरी तुम्ही नमूद केलेल्या निकटच्या नातेवाईकाला २ लाख रुपये मिळतात. एखादा अवयव निकामी झाला तर १ लाख रुपये मिळतात, ही नोंदणी व योजनाही अद्याप नवीच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणखी काही योजनाही असंघटित कामगारांसाठी जाहीर करू शकते.
Conclusion
नवा पैसाही न देता दोन लाखांचा विमा असंघटित कामगारांची करा इ-श्रम पोर्टलवर नोंदणी असंघटित कामगारांसाठी इ-श्रम पोर्टल सुरू केले आहे.
[…] […]