कायद्याच्या चौकटीत उत्सव | साजरा करा : मोनिका राऊत |
देवळाली कॅम्प : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्व अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संपूर्ण नाशिक शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे शाहरात व उपनगरांमध्ये उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळा आनंदात पण नियमाचे पालन आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करा, असे आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केल आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मारदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस आयक्त सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक
निरीक्षक संजय पिसे आदींसह विविध सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी केले.
यावेळी वैभव पाळदे यांच्यासह शिवजन्मोत्सव पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रसासनाकडून उत्सव समितीच्या असलेल्याअपेक्षा सांगितल्या. त्यास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनीही सकारत्मक राहून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मांडण्याचे आश्वासन देताना उपस्थितांना कायदाय व सुव्यवस्थेचे पालन करून उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
तर पोलीस सहायक आयुक्त सचिन बारी यांनीही सूचनांचे पालन केल्यास अनपेक्षति घटना टाळण्यात मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी पोलिसांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहनहीत्यांनी केले. यावेळी सार्वजानिक शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, खंडेराव मेढे, शेखर गोडसे आदीसह नागरिक उपस्थित होते.