कॅन्सरने तुमचे बरेवाईट झाले तर,बायको, पोराचे काय होईल? गुटखा, तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी केली जातेय जनजागृती.
शिरपूर: गुटखा, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तरुण वयात कर्करोगाने घेरले तर पुढे मुला-बाळांचे काय? हा विचार प्रत्येकाने करून व्यसनांपासून दूर राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अलीकडच्या काळात तंबाखू गुटख्याचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तंबाखू, गुटख्याच्या सेवनाने मुखाचे कर्करोग तसेच इतर कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे तंबाखूमुक्तीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी व्यसन सोडण्यासाठी जनजागृती केली जात आहे.
महिनाभर तंबाखूविरोधी
१ ते ३१ मे या काळात तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रम जिल् राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात तंबाखूमुक्ती केंद्राची सुधारणा करण्यात आली असून त्यानंतर जनजागृती केली जाणार आहे. जाणार आहेत.
कॅन्सरचा धोका
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सर. होण्याचा धोका वाढतो. कॅन्सर हा असा आजार आहे, जो मृत्यूच्या दाढेत नेऊन पोहोचवतो. त्यामुळे व्यसन म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
मौखिक आरोग्य तपासणी मोहीम
जिल्हा रुग्णालय त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात मौखिक आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. संशयित रुग्णांवर पुढील संदर्भिय उपचार केले
सिगारेट, तंबाखूबाबत नियम काय?
शासकीय कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, धूम्रपान करण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
तोंड उघडत नसेल, तर घ्या डॉक्टरांचा सल्ला
१ गुटखा खाणायांचे पूर्ण तोंड न उघडण्याच्या तक्रारी असतात. जर तोंड पूर्णत: उघडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. गुटखा खात असल्यास नियमितपणे आरोग्य तपासणी करावी तसेच व्यसन सोडून द्यावे.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. शेवटच्या टप्प्यात तंबाखू विरोधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुध्दा कारवाई ही केली जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले,