७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे कोडीद ता.शिरपूर येथे हा दिवस मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.!.
ह्यानिमित्त जि.प.केंद्र शाळा, शा.माध्यमिक आश्रम शाळा कोडीद, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अर्थे स्थलांतरीत, दि.न.पाडवी माध्यमिक विद्यालय कोडीद तसेच ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय पटांगण कोडीद येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
ह्या दिवशी विशेष ग्रामसभा घेण्यात आले ह्यात ग्रामसभेचे इतिवृत्त वाचन व आरोग्य विभागाअंतर्गत आज ग्रामसभेत स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त जनजागृती व प्रतिज्ञा वाचन व काही प्रशासकीय आदेश वाचण्यात आले.
आरोग्य विभागाअंतर्गत NCD PROGRAMME [एन.सी.डी. प्रोग्राम] (- असंसर्गजन्य रोग (Non Communicable Or Non Infectious Diseases).
आपल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ह्या कार्यक्षेत्रातील असणाऱ्या नवीन अथवा जुने On Treatment असणारे डायबिटीस रुग्ण तपासणी Diabetes Mellitus Patients Screening (शुगर / साखर रुग्ण) Random तपासणी व ब्लड प्रेशर (B.P. तपासणी) शिबिर आयोजित करण्यात आली ह्यावेळी ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
Leave a Reply