कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून : सकऱ्यापाडा येथील घटना, मुलाची शिरपूर पोलिसात फिर्याद.
कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून |
शिरपूर : कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात वडिलानी आईच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन तिचा निर्घृण खून केल्याची फिर्याद मयत महिलेच्या मुलाने सोमवारी शिरपूर पोलिसात दिली आहे. ही घटना शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट गावाजवळ सकऱ्यापाडा येथे सोमवारी दुपारी घडली. मसालीबाई नंदा पावरा (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर, नंदा डेड्या पावरा (वय ६०, रा. सकऱ्यापाडा, फत्तेपूर फॉरेस्ट, ता. साक्री) असे संशयित आरोपीचे नाव असून तो फरार झालेला आहे.
हेही वाचा : Child helpline | बाबा आईला अन् मला रोज मारहाण करतात.
फत्तेपूर मांजणीपाडा शिवारातील शेतात मसालीबाई व नंदा पावरा यांचे घर आहे. नंदा पावरा पत्नीशी वारंवार भांडण उकरून काढत तिला व मुलांना जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या वागण्याला कंटाळून मुले स्वतंत्र राहत होती. रविवारी रात्री आईसोबत उशिरापर्यंत गप्पा मारून मुलगा संजय त्याच्या घरी गेला. सोमवारी सकाळी आईवडिलांच्या शेतात गुरांचा चारा घेण्यासाठी संजय गेला असता त्याला आई अंगणातल्या खाटेवर पांघरूण घेऊन झोपलेली दिसली. त्याने आवाज देऊनही ती नल्याने त्याने पांघरूण बाजूला केले, या घरात महिलेचा खून झाला.
तर ती मृतावस्थेत आढळून आले. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून झाल्याचे उघडकीस आले. संजय हा वडिलांना शोधण्यासाठी घरात गेला असता जमिनीवर रक्त पडल्याचे दिसून आले. मात्र, वडील घरात नव्हते.
हेही वाचा : प्रत्येक महिला कडे हे हेल्पलाईन नं असायला पाहिजे
नातलग आणि शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगा संजय याने आईला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
कौटुंबिक वादातून वडील नंदा पावरा याने आई मसालीबाईचा खून केल्याचा संशय मुलगा संजय पावरा याने फिर्यादीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपी नंदा डेड्या पावरा हा फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहे. गावात चर्चेला उधाण आले आहे.