अँप्स वर फोटो टाका, ७२ तासांत खड्डेमुक्त व्हा लवकरच अँप्स नागरिकांसाठी कार्यान्वित होणार.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त आहात? राज्य शासनाच्या पीसीआरएस अॅपवर हा खड्डयाचा फोटो टाका तो खड्डा बांधकाम विभागाकडून ७२ तासांत बुजविला जाणार आहे. सध्या तरी या अँपची चाचणी सुरू आहे. लवकरच हे अॅप नागरिकांसाठी कार्यान्वित होणार आहे.
खड्डेमुक्त रस्ते करण्याची संकल्पना राज्य शासनाची आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनाच या खड्डयांचा जास्त त्रास होतो. तसेच त्यांनाच याची माहिती असते. हाच धागा पकडून आता बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविण्यासाठी संकल्पला हाती घेतली आहे. आपल्या मोबाईलमध्ये पीसीआरएस हे अॅप डाऊनलोड करून त्यात फोटो अपलोड करायचा. त्यानंतर अवघ्या ७२ तासांत हा खड्डा संबंधित कंत्राटदाराकडून बुजविला जाणार आहे.
दरम्यान, हे अँप लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु या अॅपची सार्वजनिक बांधकाम विभाग खरोखरच दखल घेणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान अॲप आले तरी त्याची प्रभावीपणे अमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशीही नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्य शासनाचे पीसीआरएस अॅप
पीसीआरएस अॅप म्हणजे खड्डे तक्रार निवारण यंत्रणा. मागील काही महिन्यांपासून या अॲपचे काम हाती घेण्यात आले आहे. याची आणखी चाचणी सुरूआहे. लोकेशन, फोटो आदींची माहिती योग्य येत नसल्याने, हे अॅप अद्याप नागरिकांना देण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार ७२ तासांत दखल मंत्रालयातून राहणार लक्ष नागरिकांच्या तक्रारींची.
अमलबजावणी न केल्यास सात दिवसात वरिष्ठ अधिकाच्यांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हालचालीवर मंत्रालयातून लक्ष राहिल.
फोटो टाका, खड्डेमुक्त व्हा
खड्डयाचा फोटो अॲपवर येताच तो संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडे पाठविला जाईल. अभियंत्रा कंत्राटदाराला सांगून खड्डे बुजवेल,
पीसीआरएस या अॲपमध्ये खड्डयाचा फोटो टाकल्यानंतर लगेच त्याची दखल घेऊन खड्डा बुजविला जाणार आहे. त्यामुळे खड्डे टाका अन् खड्डेमुक्त व्हा असे आवाहन केले आहे.
ॲपची चाचणी सुरु
या अँपची सध्या तरी चाचणी सुरु आहे. अजून ते नागरिकांसाठी खुले झालेले नाही. जेव्हा हे कार्यान्वीत होईल, तेव्हा अॅपवरील फोटोत दिसणाऱ्या खड्यांबद्दल तात्काळ ७२ तासांच्या आत कारवाई केली जाणार आहे. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.