अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपध्दती.
परिपत्रक :-नुसार
विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ येथील दि. २२.२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणानिमित्त प्रत्येकी
- १ किलो या परिमाणात रवा,
- चणाडाळ,
- साखर
- १ लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असेल
“आनंदाचा शिधा” गुढीपाडवा या मराठी नविन वर्षाणसून पुढील १ महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे ₹ १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुषंगाने पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस संचांचे वितरण करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-
१. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिनसांचा समावेश असलेला १ शिघाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच १००/- या दराने वितरीत करावेत.
२. जिल्हानिहाय पुरवठा करावयाच्या शिधाजिन्नस संचांच्य संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेले आहे. सदर संख्येच्या मर्यादेत केंद्रिय भांडार, मुंबई यांनी शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामांपर्यंत पोहोचवावेत.
३. गोदामात येणारी शिधाजिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे शिधाजिन्नस यांची नोंद online पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार AePDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी.
४. शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याचे
NABL अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त करुन घेऊन तद्नंतरच शिधाजिन्रस
संच स्विकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्नस / शिधाजिन्नस संच
स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.