गावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ही अधिकारी लोकांची अहवाल देण्यास टाळाटाळ..

धाडणे गावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ही अधिकारी लोकांची अहवाल देण्यास टाळाटाळ..

साक्री तालुक्यातील धाडणे येथील सन 2018-22 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातुन केलेल्या विकास कामासंदर्भात मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चेकबुक पुरव्यांच्या आधारे तक्रार केली होती. यातील बरीच कामे ही कागदावर तर काही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.

या अनुषगांने धाडणे गावातील भष्ट्राचाराची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवर पंचायत समिती साक्री अतंर्गत चौकशी विस्तार अधिकारी श्री.हर्षल मंहत श्री.भामरे (बांधकाम विभाग) व श्री.बेहेरे (पाणीपुरवठा विभाग) या अभियंत्यांनी (चौकशीची तारीख) दि. 9/11/2022 आणि दि.10/4/2023 रोजी चौकशीला आले असता विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. 

असे असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ अहवाल देने आवश्यक होते .परंतु आधिकारी लोक हेच उडवाउडवीची उत्तरे देतांना दिसत आहे. यामुळे कुणाला पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहे कां? असा प्रश्न सर्वसामान्यांना निर्माण होत आहे.

सरकारी नियमानुसार भ्रष्टाचार चौकशी अहवाल हा एक महिन्याच्या आत देणे आवश्यक असून सहा महिने उलटून ही अहवाल का दिला जात नाहीये ? असे स्मरण पत्र गट विकास आधिकारी सूर्यवंशी यांना वारंवार करून सुद्धा वेळ काडूपणा केला जात आहे. याचा अर्थ धाडणे गावातील ग्रामस्थांनी काय काढायचा ? याचा अर्थ अधीकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना पाठीशी घालत आहेत असे समजायचं का ?

धाडणे गावात मागील पंचवार्षिक मध्ये 14 व्या वित्त आयोगातुन सदर कामे ही फक्त कागदावर झालेली असून ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा ज्यामध्ये प्रामुख्याने शौचालय, मुतारी, पाणीपुरवठा, अंगणवाडी, RO ‌प्लांट देखील बंदच आहे. दरपत्रक न मागवता वजन काटे ,पीठ गिरणी ,अंगणवाडी खेळणी, स्पीकर अशा अनेकविध कामांमध्ये व खरेदी मध्ये अनियमितता केली आहे. 

यांचा सर्व तपशील तक्रार अर्जात दिलेला आहे. कोणत्याही विकास कामावर नावे नाहीत. कोणत्या निधीतुन झाली, किती रक्कम काढली, कामाच्या ठिकाणी कोणतेही बोर्ड नाही. एवढा गलथान कारभार झालेला आहे. एकंदरित पाहता पाच वर्षापासुन कामे फक्त कागदावरच आहेत असे दिसून आले आहे . 

सर्व गावातील विकास कामाचे जिओटैग फोटो उपलब्ध आहेत. बॅनर देखील बनवण्यात आले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांना देखील कामांची वास्तव परिस्थिती दाखवलेली आहेत. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- 2021/234/प्र.क्र.-08 /पदूम-17 मुंबई दि.24 सप्टे.‌ 2021 या शासन परिपत्रकात क्षेत्र कार्याकडे आलेल्या तक्रार हा त्यांनी संदर्भात निर्गमित केले आहे. तक्रार अर्ज सोबत पुरावे दिलेले आहेत. 

वरील सर्व बाबींच्या तक्रारीचा पाढा धुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देऊन सदर परिस्थिती अवगत करून देण्यात आली असून गटविकास अधिकारी यांनी संबधित प्रकरणात चौकशी करून अहवाल कार्यालयास व तक्रारदारास कळवण्याचे आदेश द्यावेत असे म्हटले आहे .

सदर प्रकरणात पंचायत समिती साक्री कार्यालयाकडून दफ्तर दिरंगाई केली जात आहे. यावर प्रशासकीय कार्यवाही व्हावी यासाठीच जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद धुळे यांना तक्रारीचे स्मरण पत्र देऊन तात्काळ अहवाल देण्याचे आदेश द्यावेत अशा आशयचे निवेदन देण्यात आले आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे धाडणे गावातील ग्रामस्थ तक्रार करणार आहेत.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !