ग्रामपंचायतच्या भ्रष्टचाराला विस्तार अधिकारी यांचा पाठिंबा. | सविस्तर वृत्त वाचा.

ग्रामपंचायतच्या भ्रष्टचाराला विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा पाठिंबा…

लाडबोरी: गावाची विकासाचा केंद्र बिंदू व गावाची ससंद म्हणून ज्याच्या कडे बघितले जाते ती ग्राम पंचायत या ग्राम पंचायतमध्ये गावातील नागरिकांनी आपल्या मताच्या अधिकारातून गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीना निवडून देण्यात आले, पण निवडून आलेल्या सत्तेतील लोक प्रतिनिधी गावाचा विकास न करता स्वतःचा स्वार्थ साधतं गावातील नागरिकाकडून मिळत असलेल्या कराच्या व त्यांचा घामाच्या दामाचा निधी हा सत्तापक्ष लोक प्रतिनिधी आपल्या मजीने मनमानीपणा करीत नियमाबाह्य खर्च करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि सामान्य नागरिकांच्या मिळकतीची उधळपट्टी बाबत ग्राम पंचायत मधील विरोधी पक्षनेते व  ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लीवार यांनी ग्राम पंचायत मधील सत्ताधारी लोक प्रतिनिधी जनतेच्या पैश्याची करीत असलेल्या उधळपट्टी बाबत पंचायत समिती सिंदेवाही इथे दिनांक ०२/०५/२०२३ ला तक्रार दाखल केली. 

पण दाखल केलेल्या तकारीवर विस्तार अधिकारी यांनी अजूनही कोणतेही चौकशी केली नाही. त्यामुळे तालुक्यात होत असलेल्या ग्राम पंचायतच्या भ्रस्टाचाराला सर्वस्वी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचा पाठिंबा असल्याने आज ग्राम पंचायत मधील लोक प्रतिनिधी व कर्मचारी भ्रष्टचाराला पोसत आहे, असे स्पस्टपणे यावरुन दिसून येत आहे.

गावातील नागरिकांनी म्हणून लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी च्या तक्रारीवर चौकशी केल्या जात नाही तिथे सामान्य नागरिकाच्या तक्रारीवर किती चौकशी करीत असतील असा प्रश्न निर्माण होत आहे. 

म्हणून अश्या बेपर्वा अधिकारी वर्गाच्या कामाकाजाच पितळ जनतेसमोर उघड आणी यांना नागड करण्यासाठी संविधानिक मार्गाने तहसील कार्यालय सिंदेवाही समोर दिनांक ३०/०५/२०२३ ला रोज मंगळवार ला पंचायत समिती सिंदेवाही मधील गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत) पंचायत समिती सिंदेवाही यांचा जाहीर धिक्कार व निषेध आंदोलन करण्याचा इशारा कमलाकर बोमनपल्लीवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *