ग्रामपंचायत ते महानगरपालिका मालमत्ता कर ची परिपूर्ण माहिती जाणून घ्या.

प्रत्येकाचे घर आहे, ते गावाकडे असूद्या नाहीतर शहरात असूद्या, मग त्यावर जो तुम्ही ग्रामपंचायत ते महानगरपालिका मालमत्ता कर भरता,

त्याचे पुढे काय होते? 

त्याबदल्यात तुम्हाला काय मिळते? 

त्याबदल्यात तुम्हाला काय मिळायला हवे?

पूर्ण माहिती वाचावी आणि जास्ती जास्त जनजागृती करावी ही विनंती.

मी ॲड अभिजीत उत्तम बांदल, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत दिनांक १८.०१.२०२३ रोजी १०/ई, प्रभाग क्षेत्र कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण अर्ज केला होता. (प्राप्त आ. क्र. ८६ दिनांक १३.०२.२०२३)

विषय :- कासा रिओ आणि कासा रिओ गोल्ड, लोढा पलावा, डोंबिवली पूर्व परिसरातील मालमत्ता कराचे मूल्यांकन कसे ठरवले जाते आणि ते कोण निश्चित करतात. कासा रिओ आणि कासा रिओ गोल्ड, लोढा पलावा परिसरातील प्रत्येक सोसायटीत एकूण किती मालमत्ता कर संकलन केला जातो आणि त्याचा प्रत्येक सोसायटी प्रमाणे तपशील द्यावा. तसेच त्याचे वार्षिक संकलन नमूद करावे.

माहितीचा अधिकार अर्ज हा त्यांनी ०९.०२.२०२३ विचारात घेतला. या संदर्भातील उत्तर त्यांनी जा.क्र.कडोमपा/१०ईप्रश्रे/कर/माअ/१६३ दिनांक १४.०२.२०२३ रोजी दिले. 

 त्यांनी पुढीलप्रमाणे माहिती दिली – 

 “महानगरपालिकेच्या कर आकारणी बाबत निश्चित केलेल्या ठरवानुसार त्या त्या विभागाच्या कर आकारणी दरानुसार करयोग्य मूल्य निश्चित केले जाते. तसेच कासा रिओ, कासा रिओ गोल्ड लोढा पलावा परिसरातील आपणास आवश्यक असलेल्या मिळकतीचे मालमत्ता क्रमांक पुरवल्यास माहिती देणे शक्य होईल” 

मी १५.०२.२०२३ रोजी प्रभाग क्षेत्र कार्यालयात प्रत्यक्षात गेलो होतो. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी लोढा पलावा परिसरातील ३९ सोसायटींचा मालमत्ता क्रमांक बद्दल विचारणा केली आणि संबधीत माहिती त्यांना मी द्यावी अशी अशक्यप्राय विनंती केली. त्यांनाही माहित आहे की मालमत्ता क्रमांक देणे शक्य नाही. परंतु त्यांनी दिलेल्या प्रश्नांची दखल मी घेतली नाही.

त्यासंदर्भात मी त्यांना प्रतिप्रश्न केला आणि त्याबद्दल सांगितले की *”माहितीच्या अधिकारांतर्गत मी अजून एक अर्ज देतो, त्यात तुम्ही मला सदर परिसरातील मालमत्ता क्रमांक देण्यात यावा ही विनंती”* करतो असा अर्ज देऊ का विचारले असता, ह्यातून त्यांना कळून समजले की आपल्याला अभिजीत बांदल ह्यांनी जो अर्ज दिला आहे त्याचे उत्तर देणे अनिवार्य आहे. 

तसेच मी दिलेल्या अर्जावरती ठामपणे उभा होतो आणि सदर अर्ज लवकरात निकाली काढण्यात यावा याबद्दलची विनंती केली.

महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर संबंधित अर्जाबद्दल वेळोवेळी पाठपुरवठा करत होतो.

सततच्या पाठपुराव्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मला कार्यालयात बोलवले आणि १५ दिवसाची मुदत वाढ द्यावी ही विनंती केली. त्यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहारही केला जा.क्र.कडोमपा/१०ईप्रश्रे/कर/माअ/१७७ दिनांक ०६.०३.२०२३, सदर माहिती महत्त्वाची असल्याकारणाने मी त्यांना ना हरकत फोनद्वारे मुदतवाढ दिली आणि तसेच दिनांक ११.०३.२०२२ रोजी प्रत्यक्षात कार्यालयात जाऊन त्यांना लेखी ना हरकत मंजुरी दिली आणि त्यांना विनंती केली की माहिती ही वेळेवर द्यावी.

संबंतीत अधिकारीशी सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जा.क्र.कडोमपा/१०ईप्रश्रे/कर/माअ/१२ दिनांक १७.०४.२०२३ रोजी माहीत खालील प्रमाणे दिली

“महानगरपालिकेच्या कर आकारणी बाबत निश्चित केलेल्या ठरवानुसार त्या त्या विभागाच्या कर आकारणी दरानुसार करयोग्य मूल्य निश्चित केले जाते. पलावा परिसरातील कासा रिओ आणि कासा रिओ गोल्ड हा भाग झोन क्र.४२ येत असून सदर झोनचे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी एकूण ₹ ८,९७,२४,९४२/- एवढे वार्षिक संकलन जमा झालेले असून आपण केलेल्या मागणीनुसार कासा रिओ आणि कासा रिओ गोल्ड, पलावा परिसरातील सोसायटीप्रमाणे मालमत्तेची संगणकीय नोंदींप्रमाणे यादी सोबत देण्यात येत आहे. (एकूण ३३ पाने)

पलावा परिसरातील वर्षाला मालमत्ता करापोटी एकूण ₹ ८,९७,२४,९४२ आणि दिवसाला २०,३६,३०० वॉर्ड ई, झोन ४२ मधून जमा होतात. येवढ्या पैसा वर्षाला जमा होत असेल तर काही खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

१. मालमत्ता कर भरण्याचे आपल्याला अणि आपल्या परिसरातील लोकांना होणारे फायदे कोणते ?

२. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मालमत्ता कर कुठे अणि कशासाठी वापरला जात असतो?

३. कोणत्या मालमतेवर आपणास किती टॅक्स भरावा लागेल हे कसे ठरवले जाते?

४. मालमत्ता कर भरण्याचे फायदे कोणकोणते असतात?

५. आपण जो मालमतेवर कर भरतो त्याने आपल्या परिसरातील स्थानिक नागरीकांना जीवनावश्यक स्थानिक सोयीसुविधा पुरवल्या जातात का?

६. करातून येणाऱ्या पैशातून आपल्या परिसरातील रस्ते बांधले जातात का? त्या पैशात आपल्या परिसराची सर्व स्वच्छता देखील केली जाते का? की अतिरिक्त भार आपल्यावर लादला जातोय.

७. करातून येणाऱ्या पैशातून रस्त्याच्या कडेला पथदीवे लावले जातात का? बगीचे उभारले जातात का? सांडपाणी व्यवस्थापन केले जाते का?

आपल्या मालमत्तेवर आकारण्यात आलेला कर जो आपण नेहमी भरत असतो तो स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या परिसरातील विभागातील स्थानिक नागरी सुविधांकरीता उपयोगात आणत असते.

*उदा,रस्त्यांचे बांधकाम करणे,मनपा परिसरातील विभागाची स्वच्छता करणे,शैक्षणिक कामकाज,उद्यान निर्मिती करणे,पथदीवे लावणे,सांडपाणी व्यवस्थापन करणे इत्यादी अशा सार्वजनिक कामकाजा करीता वापरत असते.*

असे अनेक फायदे आपल्या टॅक्स भरल्यामुळे आपल्या परिसराला होत असतात. म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसराच्या हितासाठी वेळेवर टॅक्स भरायलाच हवा त्याच प्रमाणे प्रशासनाला जाब विचारला हवा आहे की माझ्या करातून मला काय फायदा मिळतो?

हा मेसेज एक जनजागृती करण्यासाठी आहे. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाब विचारला पाहिजे.

एक जागरूक नागरिक

ॲड अभिजीत बांदल

९९२०६५५९५५

सी -१०३, मेडीटेरिनिया सोसायटी, कासारियो, लोढा पलावा, डोंबिवली

Mayur Sharad Borawake 

#अस्तित्व_युवा_मंच_महाराष्ट्रराज्य #evaryone #maharatra #Purandhar #explore 

– Adv Abhijeet Bandal 

#lodhapalava 

#RavindraChavan

#CMOMaharashtra 

#ShrikantShinde 

#RajuPatil

#KDMC

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !