ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा / पूर्ण माहिती

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा  / Gram Panchayat RTI Format In Marathi
ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा  / Gram Panchayat RTI Format In Marathi 


ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज : नमस्कार वाचक बंधुनो आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना. तुम्हाला एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून माहिती मिळवायची असेल तर माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागवू शकता. ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा. ( Gram Panchayat RTI Format In Marathi ) आणि माहिती अधिकार अर्ज नमुना कसा मिळवावा यासंदर्भात तुम्हाला माहिती देत आहोत.

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा :- 

  • १) माहिती अधिकार अर्जामध्ये आपल्या कार्यालयाकडून माहिती मिळवायची आहे. त्या कार्यालायचे नाव लिहा आणि संपूर्ण पत्ता लिहा.
  • २) त्यानंतर आपले किंवा अर्ज करत असेल त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता सह मोबाईल नं. लिहा. 
  • ३) हव्या असलेल्या माहितीचा तपशील च्या ठिकाणी ( तुम्हला कोणती माहिती पाहिजे ती माहिती मांगा).
  • ४) हव्या असलेल्या माहितीचा कालवधी ( संबंधात माहिती हवी असेल तो कालावधी ) 
  • ५ ) आपल्याला माहिती टपालाद्वारे पाहिजे कि व्यक्तीशा हवी, किंवा इलेक्ट्रॉनिक द्वारे ते लिहा.
  • ६ ) अर्जदार दारिद्ररेषेखालील आहे कि नाही हे लिहा. असल्यासं त्याची घायांकित प्रत जोडा.
  • ७) त्यानंतर शेवटी अर्जदार सही व ठिकाण आणि दिनांक लिहा.

वरील प्रमाणे आपण अर्ज लिहा. आणि ह्या माहिती अधिकार अर्जाची एक प्रत आपण पोहोच म्हणून घेऊ शकता. प्रथम अपील आणि दुसरे अपील करते वेळेस एक प्रत झेरॉक्स सोबत जोडून संबंधित कार्यालयात जमा करा.

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना : 

ग्रामपंचायत ( गावाचे नाव लिहा ) सन 2015 ते सन 2021 मार्च पर्यंत ची स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर झालेले लोकांचे नावाची यादी ही .नमुना नं 5 कॅश बुक, कार्यारंब आदेश ग्रामसभा ठराव क्र. ची नकल प्रत मिळावे.

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना downloads कसे करावे?

माहिती अधिकार अर्ज नमुना फ्री मध्ये मिळेल. तुम्हाला जर हवे असेल तर आमच्या सोसीअल मेडियाच्या Facebook  Link ग्रुपला जॉईन व्हा. जॉईन व्हायचे असल्यास तुम्हाला १ मिनिट थांबावे लागेल.(  Gram Panchayat  RTI Format In Marathi )

माहिती अधिकार अर्ज बाबत विशेष माहिती 

सर्वप्रथम आम्ही दिलेला माहिती अधिकार अर्ज नमुना download  करून प्रिंट मारून घ्या. आणि त्या अर्ज वर १० रु. चा कोर्ट तिकीट लाऊन घ्या. त्या व्यतिरिक्त अर्ज जमा करता येत नाही. माहिती अधिकार अर्ज शासकीय कार्यलयात जमा करण्या अगोदर एक प्रत झेरॉक्स करून घ्या. आणि जमा केल्यानंतर OC घ्या.

संबंधित लेख  हेही वाचा माहिती अधिकरातून माहिती मांगणाऱ्या कार्यकर्तेस माहिती मांगितल्यास धमकी, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ केल्यास असा अर्ज करा.

माहिती अधिकाराचा अर्ज कसा लिहावा You Tube . RTI Format In Marathi 

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना १ 

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना
ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना १ 

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना २

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना २


ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना ३

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना 3


ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना ४

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना 4

ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना ४
Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *