ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी यांनी दाखवले केराची टोपली.

पंचायत समिती शिंदखेडा जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी कपील वाघ यांनी बलकुवे येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाला दाखवली केराची टोपली.

ग्रामीण बातम्या : दिनांक 24/01/2022 रोजी बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायतने केलेल्या विकास कामांची व खर्च करण्यात आलेली निधी संबंधित माहिती अधिकार अर्ज करुन माहिती मागितली होती .


परंतु जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी एकही अर्जाची माहिती न दिल्याने सदर कामात भ्रष्टाचार झाल्याची शंका असल्याने मी सर्व कामाची इनकॅमेरा स्थळ पहाणी करुन चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु पंचायत समिती शिरपूर येथील तत्कालीन गटविकास अधिकारी व तत्कालीन विस्तार अधिकारी यांनी दिनांक 19/04/2022 रोजी चौकशी केली.

तेव्हा विद्यमान ग्रामसेवक सतीश नानासाहेब भामरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व दप्तर उपलब्ध असतांना चौकशी कामी दप्तर उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे विस्तार अधिकारी यांनी उपलब्ध दप्तर नुसार चौकशी केली असता व त्यांनी माहिती अधिकार अर्ज ची माहिती देतांना दिलेल्या चौकशी अहवाल नुसार बलकुवे येथील ग्रामपंचायत मध्ये 5656801 रुपये (छप्पन्न लाख छप्पन्न हजार आठशे एक रु) चा कामात तत्कालीन ग्रामसेवक एम एस मराठे व सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांनी अनियमितता व केल्याचे नमुद केले होते..

तरी त्यामुळे त्यांचे विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 नुसार कार्यवाही करण्याचे नमुद केले होते परंतु त्यां अहवालात त्रुटी असल्याने मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी फेर चौकशी चे आदेश दिले होते परंतु सदर पत्रास मी विरोध करुन इतर पंचायत समिती चे अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केली होती.

त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी कपील वाघ यांना चौकशी करुन सात दिवसात अहवाल जिल्हा परिषद धुळे येथे सादर करावा असे आदेश दिले होते.

परंतु एक महिना झाला परंतु विस्तार अधिकारी कपील वाघ यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांचे आदेशाला केराची टोपली दाखवून व ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी व ग्रामपंचायत मध्ये झालेल्या 5656801 रु च्या कामात अनियमितता झाल्याची स्थळ पहाणी करुन चौकशी केलेली नाही त्यामुळे त्या कामाची चौकशी का केली जात नाही या मागचे काय गौडबंगाल आहे तेच कळत नाही म्हणुन मी आता त्या प्रकरणाची तक्रार मी मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयात करणार आहे  

ग्रामपंचायत ची चौकशी न केल्याने तक्रार कर्ता माधवराव दोरीक यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कोर्ट याचिकेसाठी मोफत शासकीय वकील ची मागणी लेखी तक्रारी आणि gmail ने केली .असून

CEO यांना निलंबीत करण्याचा शासन निर्णय |

BDO यांना निलंबीत करण्याचा शासन निर्णय |

ग्रामपंचायत विस्तार अधिकारी निलंबीत करण्याचा शासन निर्णय |

छत्रपती संभाजी नगर कोर्ट कढून माहिती अधिकारात माहिती मांगण्यात आली आहे.

या याचिकेत चौकशी चा आदेश, सह शासकीय कर्मचारी यांना निलंबीत करण्याचा शासन निर्णय. शिस्त भंग कार्यवाही चे नकल पत्र कोर्टात याचिकेत करण्यात येणार आहे.

RTI कार्यकर्ता

माधवराव दोरीक बलकुवे.


लवकरच शासकीय कर्मचारी यांना निलंबीत करण्याच्या शासन निर्णय ची बातमी प्रसिद्धी करण्यात येणार आहे.. लिंक वर जाऊन ग्रुप ला जॉईन व्हा.. Link.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *