ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली.

आता ग्रामसेवक भेटणार गावातच; ग्रामपंचायतमध्ये ‘बायोमेट्रिक हजेरी ग्रामविकास विभागाचा निर्णय : गटविकास अधिकाऱ्यांना पत्र स्पेशल रिपोर्ट अनिल साठे .

शेवगाव: गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर दोनच तास कार्यालय खुले….. संपर्क साधण्याची गरज तेथील नागरिकांना आगामी काळात पडणार नाही. 

ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू 

ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. 


गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार .

याबाबतचे पत्र येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय आगामी काळात टळून गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. 

बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबतचे पत्र शासन येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले स्तरावरून आहे. त्यामध्ये तत्काळ कारवाई करून घेण्यात यावी, केलेला कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत. मात्र, ही पद्धत सुरु करण्यासाठी लागणारी यंत्र अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. बायोमेट्रिक हजेरी नंतर गावातील.


ग्रुप ग्रामपंचायतीत एकाच ग्रामसेवकाची नियुक्ती असते. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकांचे येणे-जाणे दुर्मीळ असते. या गावांचा कारभार सरपंच व त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लिपिकामार्फत हाकला जातो. ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय केवळ दोन तास उघडे राहत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत आहे.. जास्त लोकसंख्या असलेल्या गावातही सकाळी १० ते २ या वेळेतच ग्रामपंचायतीचे काम सुरू असते. दुपारी २ नंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय बंद होतात, असा अनुभव अनेकांना अनेकदा आला असेल.


आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का? ‘जिल्हा परिषदेत जायचे आहे. पंचायत समितीत काम आहे. वरच्या साहेबांनी बोलावलेय आहे. असे सांगून ग्रामसेवक निघून जातात.  त्यामुळे ग्रामसेवकांकडे असलेल्या छोट्या-मोठ्या कामामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. 


विशेषतः  कोणत्याही शासकीय कार्यालयात कामकाजाची वेळ ठरलेली असते. या वेळेत किमान कर्मचारी उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांची कामे होतात. ग्रामपंचायत कार्यालयात मात्र यापेक्षा निराळी परिस्थिती आहे. ग्रामपंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर, ग्रामसेवक नाहीत, या सबबीखाली कार्यालय उडलेच जात नाही. त्यामुळे आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का?, अशी विचारणा नागरिकांकडून होत असते. नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने सुटणार आहेत. 


● ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक  हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून, गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती.

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांची हजेरी साठी बायोमेट्रिक प्रणाली, व जनमाहिती अधिकारी फलक विषयीबाबत.. GR.
Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *