90 गावांत लोकांना मरणाची भीती अंत्यसंस्कार नसेल तर मोक्ष कसा?
मारणानंतर ही समशान भूमी नाही. |
शिरपूर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे शिरपूर तालुक्यातील सुमारे 90 गावात स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र आहे त्यामुळे लोकांना मरणाची भीती वाटू लागल्याचे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे दरम्यान शिरपूर पंचायत प्रशासनाने अमरधाम व रस्ते सुविधांचा आराखडा तयार केला आहे.
11 गावांत स्मशानभूमीत उपलब्ध नाही.
शिरपूर तालुकातील 11 पाड्यांवर मूलभूत सुविधांची वानवा आहे बहुतांश पाड्यांमध्ये समशान शेड नसल्याने उघड्यावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार याचे सोपस्कार पार पडावे लागतात.
90 गावात समशान भूमी ना रस्ताच नाही.
शिरपूर तालुक्यात एकूण 118 ग्रामपंचायती असून त्यात 147 गावे आहेत मात्र अजूनही 89 गावात स्मशानभूमीचा रस्ताच नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
11 गावांत समशान भूमी वरून नेहमीच वाद.
शिरपूर तालुक्यात 11 गावात पाड्यांवर समशानभूमी नसल्याने कुणाच्यातरी शेतात नदीकाठी अंत्य संस्कार करावे लागतात शेत मालकाने त्यात विरोधात केल्यास नेहमी वादाचे प्रसंग घडतात.
पावसाळ्यात आणखीहाल.
समशान भूमी कडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने कच्च्या रस्त्याने जावे लागते मात्र पावसाळ्यात चिखल होत असल्याने अंत्यसंस्कारासाठी जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मरणानंतरही भोग संपेना.
शिरपूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी गावे व पाड्यांवर समशान भूमी शेड नसल्यामुळे लोकांना उघड्यावरच अंत्यसंस्काराची सोपस्कार पार पडावे लागतात पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे कठीण होते त्यामुळे मरणानंतरही भोग संपत असल्याने संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे