घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी मोफत वाळु द्या | शिवसेना.

लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत वाळु द्या – पिंपळनेर शिवसेना.

पिंपळनेर : शिवसेनेच्या वतीने पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, सर्वांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने घरकुल अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांनसाठी घरकुल मंजूर झाले,.


बांधकामासाठी मोफत वाळू मिळण्यासाठी शासनाने दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभाथ्र्यांसाठी आवास योजना अमलात आणली आहे. या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रती ५ ब्रांस वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने त्या विषयी योजनेची म्हणावी तशी जनजागृती झाली नसल्याने लाभार्थी वंचित रहात आहेत.

घरकुल योजनेचे जे पण लाभार्थी आहेत ते आर्थिक व सामाजिक दृष्टीने दुर्बल असल्यामुळे त्यांना घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम करताना बऱ्याच अडचणी येत आहेत त्यात प्रामुख्याने म्हणजे वाळु मिळत नसल्याने त्यांना घरकुलाचे काम करता येत नाही.

व बाजारात जे काही वाळु व्यवसाय करणारे आहेत. त्याच्याकडील वाळूचा जो भाव आहे प्रति ब्रांस २५०० ते ३००० रुपयांपेक्षा जास्त चे भाव असल्यामुळे शासनाने वाळु आपल्या परिसरातून शुन्य महसुलात (झिरो रॉएल्टी) मध्ये उपलब्ध करून देण्यास मदत करावी व लाभार्थी हे भाडोत्री वाहनांद्वारे वाहतुकीची सोय करण्यास तयार असतील. मागास प्रवर्गातील ल सहाय यांना त्या अर्थाने मदत होईल.

 हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून सगळ्यांना मदत होईल तरी महाशयांना विनंती आहे “सदर अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व हा अर्ज निकाली काढावा.

निवेदन देते वेळी शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हिम्मत दादा साबळे , शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे , शिवसेना उपतालुका प्रमुख तुषार गवळी , शिवसेना शहर प्रमुख कृष्णकांत पुराणिक , शिवसेना शहर संघटक अतुल चौधरी , युवासेना तालुका प्रमुख रमेश शिंदे , युवासेना उपतालुका प्रमुख चिंतामण ठाकरे , युवासेना उपशहर प्रमुख मयूर नाद्रे , व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *