गावाकडे रिक्षावाल्यांनी एक अनोखा उपाय शोधून काढला होता. रिक्षात पेट्रोल भरायला परवडायच नाही. मग ते ती रिक्षा घासलेट वर चालवत. पेट्रोल महाग आणि घासलेट खूप स्वस्त !! त्यात घासलेट रेशनच्या दुकानावर पण मिळे आणि काळया बाजारात पण मिळे.
घासलेट वरची रिक्षा खूप धूर सोडायची. आवाज पण कर्कश्श असे. तात्पुरता फायदा बघून सगळेच दुर्लक्ष करत.
सहा महिन्यांनंतर त्या रिक्षाचे इंजिन खराब होई. परत गॅरेज मध्ये नेऊन खर्च करावा लागे.
पेट्रोल मध्ये वाचवलेले पैसे इंजिनच्या दुरुस्तीवर खर्च होत. पिस्टन रिंग खराब होत त्या बदलाव्या लागत.
घासलेटवर रिक्षा आणि धर्मावर देश.
जर रिक्षा चांगल्या अवस्थेत दीर्घ काळ ठेवायची असेल तर ती पेट्रोल वरच चालवायला हवी. घासलेट वापरून रिक्षाचा सत्यानाश होतो. तसंच आपला स्वातंत्र भारत हा देश जर लोकशाही , प्रजासत्ताक नुसार चांगल्या अवस्थेत ठेवायचा असेल तर तो धर्मनिरपेक्ष राज्यघटनेवरच चालायला हवा.
स्वस्तात धर्माच्या नावावर मतं मिळवून जर हा देश चालवला तर घासलेट वर चालणाऱ्या रिक्षासारखा चालेल. नुसता काळा धूर सोडेल म्हणजे देशात फक्त *राजकीय, सामाजिक ,वैचारिक प्रदुषणच दिसेल.
गेल्या आठ वर्षांत हा देश *फक्त धर्माच्या घासलेट वर* चालतोय. कारण धर्माच्या आड बहुसंख्य लोकांची मतं मिळवणं सोपं असतं. पण त्यात देशाचं इंजिन खराब होतं हे निश्चीत !!
घासलेट वापरून रिक्षाच्या पिस्टन रिंगा बसतात तसा सत्तेसाठी धर्म वापरून देशातील स्वायत्त संस्था पण बसतात. *निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक , *सीबीआय आणि मिडीया* या सगळ्याच संस्था कामातून गेल्याचं आपण बघतोय. *धर्माच्या घासलेट वर देश चालला तर हीच अवस्था होणार.* पाकिस्तानने पण धर्माचे घासलेट टाकून देश चालवला. त्यांची काय अवस्था झाली ते आपण बघतोच आहोत.
सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता हे पेट्रोल प्रमाणे महागच असणार* .पण आधुनिक जगात लोकशाही प्रजासत्ताक या तत्वाने इंग्लंड अमेरिकेसारखी राष्ट्र त्यावरच प्रगती करू शकतात !!