जंगल सत्याग्रह चे नायक नाग्या कातकरी यांचा इतिहास वाचा

Nagya Mahadu Katkari History : आदिवासी क्रांतिकारी योद्धा हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा इतिहास वाचा मराठीत : जंगलावर आदिवासींचा अधिकार आहे. अनेक आदिवासीराजे ठिकठिकाणी प्रजेची सेवा करीत होते. अनेक ठिकाणी आदिवासींनी उठाव आणि सत्याग्रह केले. त्यामधीलच एक म्हणजे १९३० सालचे आदिवासी क्रांतिकारी योद्धा नाग्याकातकरी जंगल सत्याग्रह चे कृत्य यांचा इतिहास वाचूया मराठीत. 

Nagya Mahadu Katkari History :
Nagya Mahadu Katkari History :




क्रांतिकारी योद्धा नाग्या महादु कातकरी यांचा स्मृतिदिन / History Of Nagya Mahadu Katkari 

२५ सप्टेंबर हा हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात पाळला जातो. यावेळी पथनाट्ये, गाणी, नाच-नृत्याचे आदिवासी वाड्यापाड्यांवर आयोजन केले जाते. भारतावर ७००वर्षे मोगलांनी व १५०वर्षे इंग्रजांनी राज्य केले. परकीयांच्या या राजवटीत भारतीयांवर अत्याचार झाले. या अत्याचाराविरुद्ध जागोजागी उठाव, युद्धे, आंदोलने झाली.




क्रांतिकारी योद्धा नाग्या महादु कातकरी यांचे देशभक्त बाबत काय म्हणने होते ?

१९३० साली महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून कायदेभंगाच्या चळवळीचे रणशिंग फुंकले. उरणजवळच्या चिरनेर येथेही आयोजन करण्यात आले होते. तिथे मिठाऐवजी जंगल माध्यमाचा वापर केला होता. आम्ही इंग्रजांचे सरकार मानत नाही, त्यामुळे त्यांनी लागू केलेला कायदा पाळण्याचा प्रश्न उदभवत नाही असे या देशभक्तांचे म्हणणे होते.

संबंधित लेख वाचा : आदिवासी क्रांतिवीर Tanya Mama Bhill यांचा महान इतिहास वाचा मराठीत.



आदिवासी क्रांतिकारी योद्धा नाग्या महादु कातकरी यांचा गौरवशाली कसा आहे?

रायगडच्या गौरवशाली इतिहासात महाडचा सत्याग्रह,गोवा मुक्ती लढा,जंजिरा मुक्ती लढा, चरीचा शेतकरी संपाएवढेच महत्व चिरनेरच्या जंगल सत्याग्रहास आहे. जंगलावर अवलंबुन असलेल्या गरीब आणि आदिवासींच्या उपजिविकेच्या साधनांवरच जंगल कायद्याच्या माध्यमातून इंग्रजांनी बंदी घातल्यानं त्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली होती.





आदिवासी योद्धा नाग्या महादु कातकरी यांचा जंगल सत्याग्रह कसा आहे ?

राजकीय आणि सामाजिक दृष्टया जागरूक असलेल्या रायगडातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. उरण तालुक्यातील चिरनेर येथे २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेला जंगल सत्याग्रह हा त्याचाच भाग होता. नियोजित कार्यक्रमानुसार परिसरातील हजारो शेतकरी कायदेभंग कऱण्यासाठी आक्कादेवीच्या डोंगरावर जमा झाले. आंदोलकांपैकी बहुतेकजण अशिक्षित आणि सामांन्य कुटुंबातील होते. 

आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी कुर्‍हाडीने सागाच्या झाडावर वार करायला सुरूवात केली. आंदोलकांच्या या कृतीनं फौजदार राम डी.पाटील याचं पित्त खवळलं. त्याने मामलेदार केशव जोशी यांच्याकडे जमावावर गोळीबार करण्याची परवानगी मागितली. मात्र जोशींनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या स्वातंत्र्यप्रेमी जनतेवर गोळ्या झाडण्यास नकार दिला.परवानगीही नाकारली. 

त्यामुळे पाटील अधिकच खवळले आणि त्यांनी थेट मामलेदार जोशींवरच गोळ्या झाडून त्यांच्या शरीराची चाळण करून ठार केले. ‘ताबडतोब मागे फिरा नाहीतर तुमचीही गत अशीच होईल म्हणून फर्मावले’. हा प्रकार पाहून जमाव थोडा दचकला काही पाऊले मागे गेला मात्र पळून गेला नाही. 

१९३० साली रायगड जिल्ह्यातील चिरनेर या गावी जंगलसत्याग्रह झाला.

स्वातंत्र्याचा त्यांचा निश्चय ठाम होता. कोणताही त्याग करण्याची तयारी होती. मागे गेलेल्या स्त्री-पुरुषांमधून पंधरा वीस तरुणांचा एक गट त्वेषाने समोर आला. त्यांच्याकडे हत्यारे होती. त्यांनी ती ब्रिटीश अधिकाऱ्यांवर चालवली नाहीत. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करत जंगलावर चालवली. मात्र चिडलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याने स्वतः गोळीबार सुरु केला. त्यामध्ये बारा सत्याग्रही हुतात्मे झाले. त्यात केवळ २१ वर्षाचा अत्यंत गरीब कुटुंबातील परंतु अत्यंत निडर व धाडसी असा वीर नाग्या कातकरी आंदोलन करताना पोलिसांच्या गोळीबारात धारातीर्थी पडला. 

अखेरीस एक पोलिसाच्या गोळीने त्याचा वेध घेतला आणि तो खाली पडला. राहत्या घरातच त्याचा मृत्यू झाला. अशा रीतीने कातकरी समाजातील हे फूल भारतमातेच्या चरणी वाहिले गेले. अशा असंख्य बलिदानातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले. 



निष्कर्ष :

वाचक बांधवांनो आम्ही दिलेला लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, जर काही चुकीचे लिहिले असेल तर माफ करावे. लिहिलेला लेख दुरुस्त करण्यात येईल अशा या आदिवासी क्रांतिकारी योद्धा नाग्या महादु कातकरी यांचा इतिहास आवडलाच असेल तर नक्कीच शेअर करा. Nagya Mahadu Katkari History in Marathi 



Nagya Mahadu Katkari History in Marathi You Tube


#आदिवासीक्रांतिकारक #क्रांतीकारक #स्वातंत्र्यसैनिक #आदिवासीस्वातंत्र्यसैनिक #नाग्यामहादूकातकरी #ब्रिटीशफौज #आदिवासी #महाराष्ट्रातीलआदिवासी #रायगड #आदिवासीविकासविभाग #TribalHistory #MaharashtraTribes


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !