जमिनीतील गाडलेली शेतीची15 लाख रुपये

शेवगांव तालुक्यातील कर्हेटकळी येथील जमिनीतील गाडलेली शेतीची15 लाख रुपये पाईपलाईन चोरणारे चोर शेवगांव पोलिसांकडून जेरबंद पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन.

 अविनाश देशमुख शेवगाव.

जमिनीतील गाडलेली शेतीची15 लाख रुपये
जमिनीतील गाडलेली शेतीची15 लाख रुपये 

यां बाबत समजलेली हकीकत अशी की शेवगांव पोलीस स्टेशन येथे 15 जुन रोजी फिर्यादी पंडित लक्ष्मण गायके यांच्या माहिती नुसार गु. र.नंबर 380/2022 प्रमाणे भा.दं.वि. कलम क्रमांक 379-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा तपास शेवगांवचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी स.पो.नि. आशिष शेळके स.पो.नि. विश्वास पावरा स.पो.नि. रवींद्र बागुल व पोलीस कार्मचारी यांनी पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरउन आरोपी 1) आकाश राजू पवार वय 24 रा कर्हेटाकळी 2) अलीम हसन शेख वय 36 रा कऱ्हेटाकळी 3) विष्णू भानुदास राठोड वय 30 रा कऱ्हेटाकळी 4) वैभव ज्ञानेश्वर जाधव वय 22 रा दहिगांव ने 5) राजू बाबुलाल चव्हाण वय 35 रा कऱ्हेटाकळी यां सर्वांनी ट्रॅक्टर आणि दोन जे. सी. बी. च्या सहाय्याने जमिनीत पुरलेली सिमेंट चि पाईपलाईन 15 मे तें 14 जुन पर्यंत सदर गुन्हा घडला असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे.

यातील आलिम शेख आणि वैभव जाधव यांचा शोध घेऊन जेरबंद करण्यात आले यां दोघांच्या ताब्यातून पोलीस कार्मचारी अभय लबडे यांनी सुमारे 1 लाख बत्तीस हजार रुपये किंमतीचे चोरी गेलेले पाईप गुन्ह्यात वापरलेला 10 लाख रुपये किमतीचा जे.सी.बी. स्वराज कंपनीचा 744 एफ ई कंपनीचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेली लाल रंगाची 3 लाख 68 हजार रुपये किमतीची ट्रॉली असा एकूण 15 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला तसेच गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश पवार विष्णू राठोड आणि राजू चव्हाण यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहेत सदरची धडक कारवाई शेवगांव पाथर्डीचे पोलीस उप विभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे पोलीस निरीक्षक विलास पुजारी सहा. फौ. बाळासाहेब ताके पो. हे. कॉ. प्रशांत नाकाडे पो. ना. अभयसिंग लबडे पो. ना. अशोक लिपणे पो. ना. सुखदेव धोत्रे पो. कॉ. संपत खेडकर पो. कॉ. महेश सावंत पो.कॉ. सुनील रत्नपारखी पो. कॉ. समीर फकीर महिला पो.कॉ. रुपाली क्लोर यांनी कामगिरी पार पडली 

ताजा कलम.

शेवगांव तालुक्यातील वरुर आणि भगूर गावातुन अलीकडे अनेक पाण्याच्या मोटारी बोरवेल चे साहित्य मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे!!!

 परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी वेळोवेळी शेवगांव पोलीसांकडून कारवाई झाली नाही???

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *