जागतिक आदिवासी दिन सिन्नर,सहविचार सभा संपन्न.
9 ऑगस्ट 2022 जागतिक आदिवासी दिवस |
आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ सिन्नरच्या वतीने राजेंद्र बेंडकुळे यांच्या अध्यक्षतेखाली* व देवराम खेताडे सर, राजाराम बर्डे, निवृत्ती बाबा भांगरे,शरद लहांगे (बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष),किरण मोरे(एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष),प्रकाश मदगे (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुकाध्यक्ष), विठ्ठल खोकले (आदिवासी युवा फाऊंडेशन, राज्याध्यक्ष), पांडुरंग मेंगाळ (आदिवासी युवा फाऊंडेशन महाराष्ट्र सचिव), रुपेश मुठे (माजी नगरसेवक), रामनाथ बर्डे(आदिवासी बहूजन पार्टी),अमोल गवारी(के.ए.ग्रुप सिन्नर), विलास जाधव, गणेश गुंबाडे, संदिप गवारी, प्रभाकर सुर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह सिन्नर येथे जागतिक आदिवासी दिन २०२२ संदर्भात सहविचार सभा संपन्न झाली व सर्वानुमते ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रम रुपरेषा ठरवण्यात आली.
कार्यक्रम रुपरेषा.
१)कार्यक्रम अध्यक्ष,स्वागताध्यक्ष,उद्घाटक आदिवासी समाजातील जेष्ठ व्यक्तींची निवड करावी असं ठरवण्यात आले त्यानूसार अध्यक्ष,स्वागताध्यक्ष, उद्घाटक तालुक्यातील तिन आदिवासी जमाती मधून सुमनताई बर्डे, अशोक मोरे, निवृत्ती बाबा भांगरे, राजेंद्र बेंडकुळे, कचरु मेंगाळ, देवराम बाबा गिरे ही नावे सर्वानुमते निवडण्यात आली.
आदिवासी शोभायात्रा.
२) हुतात्मा स्मारक-बस स्टॅन्ड-महात्मा जोतिबा फुले चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हुतात्मा चौक सिन्नर.
कार्यक्रम ठिकाण.
३) संदर्भात चर्चा करुन हुतात्मा चौक सिन्नर येथील नाट्यगृह ठरवण्यात आले परंतु शहरात निवडणूक आचारसंहिता लागू असल्यास पर्यायी व्यवस्था सिन्नर घोटी मार्गावरील बंधन लॉन्स ठरवण्यात आले.