जात प्रमाणपत्र किती दिवसांत मिळते आणि कोणते कागदपत्रे लागतात.

Caste Certificate :आपले सरकार सेवा केंद्र अर्ज केल्यानंतर किती दिवसांत मिळते जात प्रमाणपत्र. दाखला देण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो.  हा २४ दिवसाचा असतो. जातीचा दाखल्यासाठी कोणकोणते आवशक कागदपत्रे लागतात. संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Cast Certificate Documents PDF Downloads Maharasthra
Cast Certificate Documents PDF Downloads Maharasthra

जात प्रमाणपत्र म्हणजे काय??

कोणता  व्यक्ती कोणत्या जातीचा आहे. हे या जातीचा दाखला वरून कळते. SC /ST / OBC / NT / SBC यांचा जात प्रमाणपत्र शासकीय किंवा शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना पुरावा म्हणून आवश्यक असतो. कमीत कमी १५ आणि जास्तीत जास्त २१ दिवसात दाखला मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश काळात या दाखल्यांसाठी मोठी गर्दी होत असते, सध्या हे दाखले सहज मिळेल, म्हणून तहसील कार्यालय ने सूचना केली आहे. 

जात प्रमाणपत्र ची आवश्यकता कोठे कोठे असते 

शासनाच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी प्रमाणपत्रे देण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अनेक दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले त्यांना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळतात. याची संपूर्ण प्रक्रिया ही त्या त्या तहसील कार्यालयातून होत असते. आपले सरकार सेवा केंद्राकडून दाखल्यांसाठी आलेल्या अर्जाची तीन टेबलांवर पडताळणी केली जाते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रकरणे सेवा केंद्रांकडे पाठविली जातात.

किती दिवसांत मिळते जात प्रमाणपत्र.

आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज केल्यानंतर दाखले किती दिवसात मिळतात, याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जातीचा दाखला हा अर्ज केल्यापासून २१ दिवसात मिळणे अपेक्षित आहे.

💢 हेही वाचा : आपले सरकार वर ऑनलाईन तक्रार कशी करावी 




दाखला देण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो. 

कागदपत्रे असतील तर पंधरा दिवसातही जातप्रमाणपत्र मिळते. शासकीय कामकाजानुसारही अनेकदा प्रमाणपत्राचा प्रवास ठरत असतो. सेवा केंद्र वरून दाखला देण्याचा कालावधी हा २४ दिवसाचा असतो.

जात प्रमाणपत्र अर्जासाठी किती रुपये लागतात.

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या १३ दाखल्यांसाठीचा ३३ रुपये ६० पैसे इतका दर आकाराला जातो. शासनाने यासंदर्भातील दरपत्रक आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणी लावण्याचे आदेश प्रत्येक सेवा केंद्र चालकाला दिले आहेत.

Cast Certificate
Cast Certificate


जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे

शैक्षणिक कामकाजासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांकडून दाखल होणाऱ्या अर्जाची संख्या मोठी असते. जात प्रमाणपत्रासाठी विद्याथ्यांचा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन विचारले तरी ते कागदपत्रे सांगतील. Cast Certificate Documents List लागणारे आवश्यक  कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे. 

  • अर्जदाराचे शाळेचा दाखला, किंवा जन्म दाखला आवश्यक 
  • अर्जदाराचे आधारकार्ड, 
  • परीवाचे रेशनकार्ड.
  • शेताचे कागदपत्रे ( ७ / १२ / व ८ अ उतारा )
  • वन धारक प्रमाणपत्र
  • अर्जदारा याचे बहिण किंवा भावाचे  शाळेचा दाखला आणि जात प्रमाणपत्र आवश्यक 
  • वडिलांचा शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला आणि जात प्रमाणपत्र आवश्यक 
  • आजोबा यांचा शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला आणि जात प्रमाणपत्र आवश्यक 
  • आजोबा यांचे जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक 
  • 1950 चा जन्म नोंद चा पुरावा आवश्यक
  • स्वंय घोषणा पत्र 
  • प्रतिज्ञापत्र  
  • ड परिपत्रक 

SC /ST / OBC / NT / SBC यांचा जात प्रमाणपत्र काढायचे असेल तर वरील इत्यादी कागदपत्रे तुम्हाला Caste Certificate हे कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक आहे. आणि हे कागदपत्रे असल्या विना तुम्हाला जात प्रमाणपत्र ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वरून निघणार नाही 

पाच घटकांसाठी दिले जातात जातीचे दाखले

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून दररोज हजारों दाखल्यांचे कामकाज चालते. या केंद्रांच्या माध्यमातून जवळपास १३ प्रकारच्या दाखल्यांची कार्यवाही केली जाते. त्यामध्ये पाच घटकांसाठी जातीचे दाखले काढले जातात. १) SC / २) ST / 3)  OBC / ४)  NT / ५) SBC यांचे जात प्रमाणपत्र. 

जात प्रमाणपत्र बरोबर इतर कोणते दाखले काढले जातात.

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दाखले काढून देण्यासाठी अर्ज प्रक्रिया केली जाते. याबरोबरच वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्त्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, ज्येष्ठ नागरिक कार्ड, डोंगरी प्रमाणपत्र, ३० टक्के आरक्षण प्रमाणपत्र.

जातीचा प्रमाणपत्र साठी ऑनलाई अर्ज कसा करावा.




Caste Certificate डॉक्यूमेंट मराठी PDF / Cast Certificate Documents PDF Downloads Maharasthra

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या सोसीअल मेडिया ला जॉईन व्हा :

Caste Certificate Documents Download PDF

Link 

Facebook

Link 

Telegram

Link 


Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !