जिवाला धोकाय मग मांगा शस्त्र परवाना कसा करावा अर्ज

साहेब, जिवाला धोकाय; मला शस्त्र परवाना हवा ! अनेक प्रकरण मध्ये जिवाला धोका असतो म्हणून पोलीस प्रोटेक्शन असणे आवश्क असते परंतु मिळत नाही, म्हणून पोलिसंकढून  शस्त्र परवाना मंगयालाच पाहिजे. चला तर अर्ज कसा करावा जाणून घेऊया .

जिवाला धोकाय मग मांगा शस्त्र परवाना कसा करावा अर्ज
 जिवाला धोकाय मग मांगा शस्त्र परवाना कसा करावा अर्ज 


पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा लौकिक असला तर गुन्हेगारी जगतातही पुणे इतर शहरांपेक्षा मागे नाही, त्यामुळे जिवाला धोका असण्याची कारणे देत स्व-संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्यासाठी शेकडो अर्ज पुणे पोलिस आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेकडे येत आहेत. 

Related News : Police Complaint Link 

पुणे पोलिसांकडे १९३२ सालापासूनच्या शस्त्र परवान्याच्या नोंदी असून, अगदी तेव्हापासून २०१८ पर्यंत एकूण ३९ हजारांपेक्षा जास्त नागिरकांना शस्त्र परवाना दिला गेला आहे. मात्र, त्यानंतरच्या शस्त्र परवाना नोंदीची नेमकी संख्या पोलिसांकडून दिली जात नाही. परंतु २०१८ ते २०२३ पर्यंत परवानाधारकांची संख्या किमान पन्नास हजारांवर गेली आहे.

नोंदी होत आहेत अद्ययावत
• शस्त्र परवाना देण्याचे अधिकारी ज्या- त्या राज्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने त्याच्या नोंदीमध्ये एकसूत्रीपणा नव्हता. त्यामुळे केंद्रीय गृह विभागाने शस्त्रास्त्र परवान्याच्या नोंदीसाठी युआयडी क्रमांक पद्धती सुरू करण्याचे आदेश दिले.

• पुणे पोलिसांनीही देखील शस्त्रास्त्र पर- वानाधारकांना युनिक आयडेंटी- फिकेशन नंबर देण्यात येत आहेत. केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ८८ हजार ११८ शस्त्र परवाने दिले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक शस्त्र परवाने दिले आहेत. २०२३च्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात १२ लाख शस्त्र परवाने आहेत.

अर्ज कसा करायचा?


शस्त्र परवाना मिळण्यासाठी शहरात राहणाऱ्या नागरिकांना पोलिस आयु- क्तालयात तर ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात गृह विभागाकडे विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावा लागतो, 

• अर्जासोबत कोणती बंदूक (गन) घेणार आहेत त्याची माहिती, ती का घेणार आहात त्याचे कारण, तीन वर्षांचा इन्कमटॅक्स रिटर्न, तुमच्यावर गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र, फोटो ही कागदपत्रे जोडावीत.
तुम्हाला कोणती माहिती पाहिजे 
खाली क्लिक करून website वर भेट द्या. आपले प्रश्न मांडा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *