धुळे : ढगाळ वातावरणाने वाढली धाकधूक. खान्देशातील तापमानात अजून घट होण्याचा अंदाज.
धुळ्यात थंडीची लाट.ढगाळ वातावरण.
धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा बुधवारी ७.६ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीची लाट आली आहे. हवेचा दाब वाढल्याने आठवडाभर हुडहुडी कायम राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. रविवारी ९.६, सोमवारी ७.८, मंगळवारी ७.८, तर बुधवारी ७.६ इतके नीच्चांकी तापमान नोंदविण्यात आले आहे. तापमान आणखी एक डिग्री सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
ढगाळ हवामान राहणार असल्याचा जिल्हा कृषी हवामान यांचा इशारा. |
जळगाव/धुळे/नंदुरबार : जळगावसह धुळे व नंदुरबारात बुधवारी संपूर्णत: ढगाळ वातावरण होते. असेच वातावरण पुढील काही दिवस राहिल्यास याचा दुष्परिणाम रब्बी हंगामावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुधवारी जळगावचे किमान तापमान होते. तर नंदुरबारात किडीचा धोका, असून नंदुरबारात बुधवारी ८ अंशांपर्यंत जिल्ह्यात दोन दिवस ११ अंशावर पोहचले होते. दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. ढगाळ वातावरण राहिले. बुधवारी किमान तापमानात २.२ अंशाने वाढ झाली असली तरी गारठा मात्र वाढला होता. गुरुवारपासून तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज आहे. ९ व १० जानेवारी रोजी तापमानाचा पारा ९ अंशापर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
ढगाळ हवामान राहणार असल्याचा इशारा जिल्हा कृषी हवामान केंद्रातून देण्यात आला आ हे. यामुळे दोन दिवस हवेचा वेग सरासरी १५ ते १७ किमी प्रतितास
राहणार असल्याने रब्बी पिकांवर कीड रोग निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानामुळे पुढील काही दिवस तापमान, २८ ते ३० अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १० ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
सध्या असलेली थंडी रब्बी पिकास पोषक असली तरीही येत्या दोन दिवसांत अधून-मधून निर्माण होणारे ढगाळ वातावरण पिकांना घातक ठरु शकते. यातून हरभरा पिकांवर घाटेअळी, गहू आणि ज्वारी पिकांवर मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कांदा पिकावर करपा तसेच मिरचीवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज.पंजाब डख, हवामान अभ्यासक.
उद्या पासून 9 ते 10 राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल तसेच 11, 12, 13, 14, 15 या तारखेला.संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार तसेच पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र (धुळे जळगाव नंदुरबार ) हा पाऊस जास्त राहील व विजांचे प्रमाण खूप जास्त राहणार आहे म्हणून कोणीही झाडाखाली व शेतात थांबू नये* वातावरण तयार झालं की सरळ घरी निघावे *सर्व शेतकऱ्यांनी आपली व आपल्या पिकाची काळजी घ्यावी*