‘तक्रार करून काही होत नाही रे ‘ असं म्हणणार्‍यांनी अवश्य ही बातमी वाचा

‘तक्रार करून काही होत नाही रे ‘, ‘सर्व सामील असतात’ असं म्हणणार्‍यांनी अवश्य ही बातमी वाचा. सामान्य नागरिकांनी ठरवले तर तो काहीही करू शकतो. 

एकट्या माणसाने संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून दाखवली.

ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जनजागृती ग्राहक मंच, पनवेल  चे संतोष विचारे, ग्रामस्थ विरुद्ध सरपंच व सदस्य ग्रामपंचायत वासाबे, खालापूर प्रकरणात निकाल देताना विभागीय आयुक्त, कोंकण यांनी थेट सर्व ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले.

विशेष कौतुक की भ्रष्टाचारी लोकांना घरचा रस्ता दाखविला लोकशाही मध्ये सामान्य नागरिक हे खरे मालक आहेत व त्यांच्या बाजूने कोकण आयुक्त डॉ कल्याणकर साहेब यांनी निर्णय देऊन आमची इच्छा शक्ती वाढवली त्यांचे आभार. – Santosh Vichare

PDF पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

Link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *