गिधाडे पुलावरून तापी नदीत दिले झोकुन, मुलगा बेपत्ता आईचा मृतदेह सापडला.
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील गिधाडे लगत तापी नदी पुलावरून शिरपूर तालुक्यातील वाडी येथील योगिता बाई रवींद्र सिंग राजपूत वय 30 या महिलेने आपल्या तेजेंद्र या दहा वर्षीय मुलासह गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
गिधाडे पुलावरून तापी नदीत दिले झोपून, मुलगा बेपत्ता आईचा मृतदेह सापडला. |
सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह सापडला तर मुलाचा शोध लागला नव्हता. अंधारामुळे काम थांबवण्यात आले योगिता बाई राजपूत चे माहेर शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील आहे ती मुलासह डोंगरगाव येथून गुरुवारी सासरवाडी गावाकडे निघाली होती तिने वाडी येथे न जाता शिरपूर येथे उतरून गिधाडे येथील तापी पूल गाठला पुलावरून घेणाऱ्या जाणाऱ्यांनी दोघानां नदी पत्रात पुलावरून उडी घेताना बघितल्यानंतर धाव घेतली घटनास्थळी बॅग चपला व वह्या मिळून आल्याने वही वरील नावे व फोन नंबर वरून महिलेची ओळख पटवण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
घटनास्थळी योगिता बाई यांचे नातेवाईक दाखल झाले होते.
महिलेचा पती रवींद्र हा सुरत येथे कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी वाडी गावी येथे शेती घेतली होती त्यासाठी रक्कम जुळवण्यासाठी ते सूरत येथे गेले होते त्याच्या पश्चात ही घटना घडली.
हेही वाचा शकता. 👇👇
1) *ग्रामीण आणि शहरी लोकांसाठी वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाइन अर्ज सुरू*
3) Google वर जास्त काय सर्च करतात लोकं.
4) कृषी केंद्र चालकास सोयाबीनचे बोगस बियाणे देणे पडले* महागात
5) *शिक्षकाची फसवणूक भामट्या वर गुन्हा.एक हजाराचा रिफंड पडला दीड लाखात.
6) Life Insurance – ICICI Prudential Life Insurance Company in India – Gramin batmya