धडगाव येथील वीज तंत्रज्ञाला जातीवाचक शिवीगाळ आदिवासी संघटनांचा मोर्चा,

धडगावात आदिवासी संघटनांचा मोर्चा, संबंधीत अभियंत्याविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा.

धडगाव येथील वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाला जातीवाचक शिवीगाळ करुन निलंबित केल्याप्रकरणी तहसिल कार्यालयावर विविध पक्ष व संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आल्यानंतर सदर निलंबन रद्द करण्यात आले असून संबंधीत उपकार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगावात आदिवासी संघटनांचा मोर्चा, संबंधीत अभियंत्याविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा.  धडगाव येथील वीज वितरण कंपनीच्या तंत्रज्ञाला जातीवाचक शिवीगाळ करुन निलंबित केल्याप्रकरणी
धडगांव येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञाला विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख करत अश्लील शब्दाचा प्रयोग करत शिवीगाळ व निलंबनाच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व पक्षीय व विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कचेरी वर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिरता पावरा यांचे तात्काळ निलंबन रद्द
करून मूळ नेमणूकीच्याच ठिकाणी नेमणूक आदेश अशी लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. संबंधित | अभियंत्याविरोधात अनुसूचित जाती.
जमाती प्रतिबंध अधिनियमाद्वारे ३ (१) आर, ३ (१) एस. ५०४, ५०६ नुसार उशिरा पोलीसस्टेशनला धडगाव गुन्हा नोंदवण्यात आला. यामोर्चात आ. आमश्या पाडवी, किरसिंग वसावे, नगराध्यक्ष धनसिंग पावरा, जि.प. सदस्य विजय पराडके, गणेश पराडके, हारसिंग पावरा, रेहंज्या पावरा, अॅड. बापू पावरा, दिलवर पावरा, नगरसेवक पुरुषोत्तम पावरा, रघुबीर पावरा, कल्याण पावरा, हेमंत पावरा, प्रविण पावरा, संदीप पावरा, छोटू पावरा, संजय पावरा आदी उपस्थित होते.
देण्यात यावी व संबंधित अभियंत्यावर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यासाठी मोर्चेकरी अधिक आक्रमक झाल्याने अखेर कार्यकारी अभियंता अमित शिवलकर यांनी १० दिवसात भिरता पावरा यांचे निलंबन रद्द करून त्यांच्या मूळ ठिकाणीच कामावर हजर करण्यात येईल
भिरता पावरा यांचे निलंबन १० दिवसाच्या आत मागे घेण्यात यावे अन्यथा सर्व पक्षीय जनता व आदिवासी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरून धडगाव शहर बंद करण्यात येईल, असा इशारा आ. आमशा पाडवी यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *