धुळे जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा यांना जनजाती आयोगाची नोटीस. कारण वाचून थक्क व्हाल.

शिरपूर येथील आदिवासी व्यक्तिचि जमीन खोटे कागदपत्रे बनवुन बिगर आदिवासी व्यक्तिच्या नावावर करून आदिवासी व्यक्तीला भूमिहीन केल्याप्रकरणी श्री जलज शर्मा जिल्हाधिकारी धुळे यांना जनजाती आयोगाची नोटीस.

धुळे जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांना जनजाती आयोगाची नोटीस. कारण वाचून थक्क व्हाल.

ब्रेकिंग न्यूज ग्रामीण बातम्या :- *शिरपूर धुळे येथील खोटे कागदपत्रे बनवून आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावावर करून आदिवासी व्यक्तीला भूमिहीन केल्याप्रकरणी जनजाती आयोगाला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्याकडून दिनांक 20.02.2023 रोजी संलग्न केलेली याचिका/तक्रार/माहिती प्राप्त झाली असल्याने आयोगाने घटनेच्या कलम 338A अन्वये दिलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी/चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या जनजाती आयोगाची ही नोटीस जिल्हाधिकारी धुळे यांना मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत आरोप/प्रकरणांवर केलेल्या कारवाईची वस्तुस्थिती आणि माहिती पोस्टाने किंवा वैयक्तिकरित्या किंवा अन्य कोणत्याही संपर्काद्वारे पाठविण्याचे नोटीसद्वारे सूचना दिली.

असून आयोगाने जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडून आयोगाला 15 दिवसांच्या आत उत्तर न मिळाल्यास विहित वेळेत, आयोग दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करू शकेल व भारतीय राज्यघटनेच्या कलम 338A अंतर्गत आणि जिल्हाधिकारी धुळे यांना जनजाती आयोग दिल्ली येथे हजर राहण्यासाठी समन्स जारी करेल असे नोटीसद्वारे आयोगाचे श्री एच.आर.मिना संशोधन अधिकारी जनजाती आयोग दिल्ली यांनी आदेश दिले आहेत*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !