नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान अर्ज भरणे झाले चालू .| Navinya Purna Yojana 2023

नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान अर्ज भरणे झाले चालू .| Navinya Purna Yojana 2023
नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान अर्ज भरणे झाले चालू .| Navinya Purna Yojana 2023 Navinya Purna Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्व योजना साठी ऑनलाइन अर्ज सुरु केले आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून राज्य स्थरीय नाविन्य पूर्ण योजना योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या साठी Official वेबसाईट हि चालू झाली आहे. नाविन्यपूर्ण योजना काय आहे? यासाठीची पात्रता, अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतील? अर्ज कसा करावा इत्यादी संपूर्ण माहिती देत आहे.

Table of Contents

नाविन्यपूर्ण योजना काय आहे ? (Navinya Purna Yojana २०२३)

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी राबविली जाणारी एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना (Navinya Purna Yojana २०२३) होय. या योजनेच्या माध्यमातून पात्र व गरजू लाभार्थी शेतकरी, पशुसंवर्धन, पशुपालक यांना गाय, म्हैस, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादीसाठी 75 टक्के अनुदान दिलं जातं.
योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. अर्ज भरल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार अनुदान तत्वावर वरील नमूद पशुसांठी 75 टक्के अनुदान रक्कम तत्त्वावर वाटप केले जाते.

योजना संपूर्ण नाव – नाविन्यपूर्ण योजना

विभाग – पशुसंवर्धन विभाग
लाभार्थी – राज्य महाराष्ट्र
लाभार्थी वर्ग – शेतकरी, पशुपालक
अधिकृत वेबसाईट – ah.mahabms.com/
दोन प्रकार च्या नाविन्यपूर्ण योजना .

Navinya Purna Yojana : सामान्यता ह्या योजना दोन प्रकारच्या आहेत. यामध्ये पहिला गट म्हणजे राज्यस्तरीय नाविन्य पूर्व योजना तर दुसरा गट म्हणजे जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना.

 • पहिला गट मध्ये गाय, मेंढीपालन, शेळीपालन यासाठी राज्यस्तरीय योजना राबविली जाते.
 • दुसरा गट 23 योजना किंवा उपघटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. जी जिल्हास्तरीय योजना राबविली जाते.

नाविन्यपूर्ण योजनासाठी अनुदान किती ?

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जर लाभार्थी अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीतील असेल, तर अश्या अर्जदारांना 75 टक्के अनुदान दिलं जातं, तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थी अर्जदारांना 50 टक्के अनुदान दिलं जात.

कोणत्या जिल्ह्यांचा समावेश नाही.

सामान्यतः या योजनेचा राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये गाई, म्हशी पालन केलं जात नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्हे या योजनेतून वगळण्यात आले आहेत. ज्यामध्ये अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही .

कोणत्या विभागात गट वाटप करणार?

Navinya Purna Yojana : योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.

अर्ज करण्याची मुदत

योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी, पशुपालकांना ०९/११/२०२3 रोजी ०३:०० पासून ते ०८/१२/२०२३ रोजी रा. १२:०० वा पर्येंत मुदत देण्यात आलेली आहे.


नाविन्यपूर्ण योजनासाठी पात्रता काय आहे. 

 • १) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
 • २) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
 • ३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
 • ४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
 • 5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )

कोकण व विदर्भ विभागातील लोकं साठी विशेष महिती :

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्‍या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.अर्जासाठी आवश्यक कागदपत्र / Navinya Purna yojana 2023

 • १)  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
 • २) सातबारा (अनिवार्य)
 • ३)  ८ अ उतारा (अनिवार्य)
 • ४)  अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
 • ५)  आधारकार्ड (अनिवार्य )
 • ६)  रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
 • ७) बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
 • ८)  रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
 • ९)  ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
 • १०) अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
 • ११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
 • १२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
 • १३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • १४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • १५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • १६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • १७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
अर्ज कसा भरावा .
सदर Navinya purna yojana साठी हि online भरायचा आहे. तरी आपल्या जवळच्या online सेतु केंद्नेराला नक्कीच भेट द्या. घरबसल्या फोर्म भरण्यासाठी ..लिंक . दिलेली आहे. काही समस्या असेल तर या लिंक वर क्लिक करून. समस्या जाणून घ्या.


नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान अर्ज भरणे झाले चालू .| Navinya Purna Yojana 2023
नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान अर्ज भरणे झाले चालू .| Navinya Purna Yojana 2023 

नाविन्यपूर्ण तलंगा गट योजना घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरा.

Link 

नाविन्यपूर्ण  दुधाळ गाई -म्हैस साठी योजना घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरा.

ह्या शासकीय योजनानेचा लाभ घ्या : १) कृषी योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार लाभाच लाभ.  लिंक 

२) नवीन विहिरीयोजना साठी अर्ज सुरु 100% अनुदान लिंक 

नाविन्यपूर्ण योजना 75 टक्के अनुदान घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा भरावा  .| You Tube


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *