नोकरी वाचविण्यासाठी मुलगी दत्तक दिली; पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध हायकोर्टात याचिका २००५ नंतर तिसरं मूल: महाराष्ट्र नागरी सेवा नियम उल्लंघनाचा आरोप
नोकरी वाचविण्यासाठी पोलिस अधिकान्यांनी नियमाचे उल्लंघन केले. |
सोलापूर : नोकरी वाचविण्यासाठी पोलिस अधिकान्यांनी नियमाचे उल्लंघन केले. तिसरे अपत्य २००५ नंतर झाले. दुसरं मूल दत्तक दिल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
बार्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्याविरोधात २१ सप्टेंबरला ही याचिका असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, अशी माहिती अॅड. तृणाल टोणपे यांनी दिली. गिरीगोसावी हे महाराष्ट्र पोलिस विभागात १९९८ पासून कार्यरत आहेत. सध्या ते बार्शी पोलिस ठाणे येथे कार्यरत आहेत.
Related News : Police Act / Link
‘महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ नुसार दोनपेक्षा जास्त मुलं जर सरकारी नोकरांना झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते, या पोलिस निरीक्षकांवर आरोप आहे की, त्यांना आधी दोन मुली होत्या आणि पुन्हा ..कायद्याला अमान्य याचिकाकत्यचि मूळ म्हणणं असं की, २००५ अधिनियमाच्या कलम ३ नुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असेल तर कायद्यानुसार ते अमान्य करण्यात आले.
संबंधित पोलिस निरीक्षक सध्या सेवेत आहेत आणि २००५ नंतर त्यांना तिसरे मूल जन्माला आलेलं आहे. त्यापैकी त्यांनी संस्कृती गिरीगोसावी या पाल्याचा त्याग करून ते दत्तक दिल्याचं सांगितलेलं आहे. उद्या अनेक सरकारी नोकरीत काम करणारे नोकर मुलासाठी दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालतील आणि दत्तक दिल्याचं सांगतील, हे
कायद्याला मान्य नाही.
दोन मुलीनंतर मुलगा यामुळे अनेकांना गमवावी लागू शकते नोकरी पोलिस उपनिरीक्षक या पदावरती कार्यरत असताना या पद्धतीने आपली तीन अपत्य असल्याची माहिती लपविणे, तसेच मुलगा हवा असण्याच्या हव्यासापोटी व नोकरी वाचविण्यासाठी मुलीला दत्तक देणे हे बेकायदेशीर व असंविधानिक आहे. त्यामुळे चुकीचा पायंडा रचला जाण्याची शक्यता आहे, अशा गोष्ठीना आळा घालणं अत्यंत गरजेचे आहे. -अँड. तृणाल टोणपे, बार्शी,
याचिकेमध्ये आरोप करण्यात आलेला आहे की, पोलिस निरीक्षकांना तीन मुले आहेत. त्यापैकी प्रथम अपत्य नयन (१९९६), द्वितीय द्वितीय मुलगी संस्कृती (१९९९), तर मुलगा अर्जुन संतोष गिरीगोसावी (२०१०) जन्मलेला आहे. त्यांना तिसरं मूल झालं, मुलगा हवा म्हणून त्यांनी असे केल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. अॅड. तृणाल टोणपे यांच्यासह अॅड.
अनिरुद्ध रोटे, अॅड, निकिता आनंदाचे, अॅड, आशुतोष शिंदे, अॅड. सिद्धी जागडे, पूजा तुपरे मार्फत याचिका दाखल केली.