नोटीस न देताच विज पुरवठा खंडीत करणे महावितरण ला भोवले.

ग्राहक तक्रार निवारण मंच औरगाबादचा महावितरणला दंड.

नोटीस न देताच विज पुरवठा खंडीत करणे महावितरण ला भोवले. 

पैठण :- शहरातील यंशवतनगर येथील नागरिक श्री नितीन दामोदर वानखडे यांच्या नांवावर विज मिटर असुन महावितरण कडुन सातत्याने एप्रिल 2020 पासुन ग्राहकास मिटर फाॅल्टी अशी बिलावर नोंद असलेली विज देयके महावितरणकडुन मिळत होती .विघुत नियामक आयोग 2021 च्या कृतीच्या मानके विनिमय 16.3.6 नुसार महावितरण ग्राहकाला एका आर्थीक वर्षात दोन बिलापेक्षा अधिकची अंदाजित देणार नाही असा नियम आहे. माञ ग्राहकास एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात 12 विज देयके देण्यात आली.


एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यत 12 देयके देण्यात आली. त्यांनतर सूध्दा महावितरण यांनी एप्रिल 2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत ऐकून सात विज देयके अंदाजीत दिली वीज पुरवठा सुरू असताना सुद्धा महावितरण कडून वीजबिलावर माहे आॅगस्ट 2022 मध्ये टीडी अशी नोंद असलेली वीज देयके ग्राहकास मिळाली मात्र ग्राहक यांनी दिनांक 11 -10-2022 रोजी महावितरण कडे अर्ज करुन माझा वीज पुरवठा सुरळीत चालू असून भविष्यात माझ्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे महावितरणला लेखी कळविले त्यानंतर महावितरण ला जाग आली व त्यांनी ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला.

वीज अधिनियम 2003 चे कलम 56 नुसार नोटीस.

मात्र याबाबत वीज अधिनियम 2003 चे कलम 56 नुसार नोटीस दिली नाही महावितरण कडून होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी चाप बसावा म्हणून ग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे राहणार यशवंत नगर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यांनी दिनांक 2- 12- 2022 रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यावर दिनांक 10-1- 2023 रोजी औरंगाबाद येथे सुनावणी झाली त्यानंतर पुन्हा 17-1-2023 व 24 -1 -2023 ला सुनावणी झाली. महावितरण कडून मीटरचे रीडिंग न घेताच प्रदीर्घ काळासाठी चुकीचे वीज देयके दिल्याकारणाने महावितरणने ग्राहकास अडीचशे रुपये नुकसान भरपाई द्यावी.

कर्मचारी यांची नियमानुसार कारवाई.

तसेच या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी नोटीस न दिल्यामुळे महावितरणने अर्जदारास अडीचशे रुपये नुकसान भरपाई द्यावी सदर आदेशाची पूर्तता केल्याचा अहवाल महावितरण ने सदर आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद यांच्याकडे सादर करावा असे आदेशात नमूद आहे. ग्राहकाच्या वतीने ग्राहक प्रतिनिधी श्री अंबादास पवार महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटना शेगाव तालुकाध्यक्ष यांनी बाजू मांडली तर महावितरण कडून उपकार्यकारी अभियंता पैठण उपविभाग श्री रंधे यांनी आपली बाजू मांडली 

ग्राहकाची प्रतिकिया :- सदर आदेशाने समाधानी नसुन विज अधिनियम 2003 चे कलम 56-1 नुसार नोटीस न देताच विज पुरवठा खंडीत केलेला आहे त्यामूळे प्रतितास 50 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देणे होते सदर आदेशाने समाधानी नसुन सदर प्रकरण विघुत लोकपाल नागपुर यांच्याकडे दाखल करणार असुन अन्यायाविरुध्द न्याय मागणार आहोत अशी प्रतीक्रिया ….. च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !