न्यू बोराडी येथील आदिवासी विद्यार्थ्याची गगन भरारी. रामेश्वर प्रेमसिंग पावरा,

कर्तृत्व सिद्ध करत आदिवासी मुलगा थेट जर्मनीत सनपुले आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्याची गगन भरारी. | Rameshwar Premsing Pawara, New Boradi

Rameshwar Premsing Pawara, New Boradi

ग्रामीण बातम्या : मराठी भाषेमध्ये एक म्हण प्रचलित आहे. “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या नुसार सचोटी, नवउपक्रमशीलता, अभ्यासूपणा, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड, जिज्ञासा, ध्येयावर नजर आधीपासूनच या विद्यार्थ्यांच्या अंगी बानलेले होते. न्यू बोराडी तालुका शिरपूर येथील आदिवासी विद्यार्थी रामेश्वर प्रेमसिंग पावरा याने शिक्षणाच्या माध्यमातून आपले कर्तृत्व सिद्ध करत आपल्या आदिवासी बांधवांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ज्ञानाचा बळावर थेट जर्मनीत जाऊन 

३६ लाखाचे वार्षिक पॅकेज या विद्यार्थ्यास मिळाले आहे.

घरची परिस्थिती जेमतेम वडील शेतकरी, आई गृहिणी असे असताना प्राथमिक शिक्षण सिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील कस्तुराबाई आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिक) शिक्षण त्याने पूर्ण केले. अकरावी व बारावी सायन्स दाजीबा आर्ट्स अँड सायन्स उच्च माध्यमिक विद्यालय सनपूले आश्रमशाळा येथे पूर्ण केले. याच ठिकाणी त्याच्या पाया मजबूत झाला, अनेक शिक्षकांनी त्याला ध्येयावर नजर टिकवण्यासाठी मार्गदर्शन केले. 

यापुढील काळात समर्थ भारत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अहमदनगर येथून बी. एस. सी.एच. एस. आणि परिक्रमा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट काष्टी,  अहमदनगर येथून एम. बी. ए. त्याने पूर्ण केले. पुढे डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज   (डी. बाय. पी. आय. एम. एस. आकुर्डी, पुणे)येथे तो शिकला.

आता इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड, फ्रैंकफुर्ट जर्मनी येथे टेक लीड म्हणून निवडला गेला आहे. या निवडीबद्दल सनपुले आश्रमशाळेचे संस्था अध्यक्ष, सचिवमुख्याध्यापक, तसेच त्याला मार्गदर्शन व प्रेरणा देणारे सनपुले आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *