पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषणे

Umaji Naik Bhashan : माझा प्रिय वाचक बंधुनो आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे. भारतभूमीचा पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषण | Umaji Naik Bhashan जे तुम्हाला वाचायला, पाठांतर करायला आणि निबंध लिहायला सोप्यात सोपी लेख दिलेला आहे. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

आणि निबंध
पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषणे


भाषणाची सुरवात : नमस्कार, आदरणीय व्यासपीठ, येथे आलेले प्रमुख पाहुणे, सर्व शिक्षक कर्मचारी, आणि बंधू भागींनो आज मी भारतभूमीचा पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषण सांगणार आहे. ते तुम्ही दोन मिनिट शांत चित्ताने ऐकावे हि नम्र विनती. 

राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषण

भारतभूमीचा पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांच्या जन्म ७ सप्टेंबर १७९१ मध्ये पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. उमाजी नाईक यांचे वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी नाईक लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. उमाजी नाईक यांचे वडील दादजी खोमणे यांनी त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये शिकवले होते. Umaji Naik हे ११ वर्षांचे होते तेव्हा वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी उमाजी नाईक यांचाकडे आली.

अठराव्या शतकाच्या १८०३ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोशीयांच्या  ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. १८०३ मध्ये संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. तसेच उमाजी नाईक पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. त्यावेळी बरेचशी लोकं रामोशी त्यांना आपला नेता मानत होते. १८०३ मध्ये उमाजी नाईक यांना इंग्रजांच्या हाती लागल्याने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. आणि  १८०३ मध्येच तुरुंगातून सुटल्यानंतर एका दरोड्यात ते पुन्हा पकडले गेले व त्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि कैदेत असताना ते लेखन–वाचन शिकले.

उमाजी नाईक यांचा निबंध वाचायचा असेल तर येथे क्लिक करा. 

उमाजी नाईक यांची जीवन चरित्र बाबत थोडक्यात माहिती?

 • (१८२४-२५). मध्ये इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला
 • १८२५ अठराव्या शतकाच्या मध्ये सत्तू मृत्यू पावल्यानंतर त्याच्या टोळीचे उमाजी प्रमुख झाले.
 • २८ ऑक्टोबर १८२६ उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने त्यांच्या विरुद्ध जाहीरनामा काढला.
 • १८२६ उमाजी नाईक व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. 
 • १८२६ मध्ये उमाजी नाईकनी भिवडी, किकवी, परिंचे, सासवड व जेजुरी भागात त्यांनी लुटालूट केली.
 •  उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ८ ऑगस्ट १८२७ रोजी पुन्हा एक जाहीरनामा काढला.
 • उमाजींना पकडणाऱ्यास १२०० रु. चे बक्षीस जाहीर केले.
 •  (१५ डिसेंबर १८२७). उमाजी नाईकने इंग्रजांना आव्हान देत पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन याच्याकडेच आपल्या मागण्या केल्या.
 • उमाजी नाईक व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. 
 • ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढला.
 • उमाजी नाईकांना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. 
 • इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी दिली.

अठराव्या शतकाच्या महान आद्य क्रांतिकारक भारतभूमीचा पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांचा इतिहास जाणून घ्या येणाऱ्या पिढीला आपले राजे महाराजे देशासाठी लोकांसाठी इंग्रजाविरुद्ध कशी लढाई लढले. आणि त्यांचे नेतृत्व कसे होते हे वाचून घ्या. 

आज मी  महान आद्य क्रांतिकारक भारतभूमीचा पहिला शहीद भूमिपुत्र राजे उमाजी नाईक यांचा इतिहास भाषण आपणास सांगितला. आशा आहे कि तुम्ही ऐकलात तसेच अशा प्रकारे माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद.

Umaji Naik Information in Marathi उमाजी नाईक यांचा संपूर्ण इतिहास वाचायचा असेल तर येथे क्लिक करा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *