पिंपळनेर गावाची गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा

पिंपळनेर गावाची गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा — गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश.

पिंपळनेर गावाची गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करा -- गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश. अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या मागणीला यश

अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या मागणीला यश.

 पिंपळनेर – पिंपळनेर गावात गावठाण व गायरान जमिनीवर गेल्या 50 वर्षापासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे, सदर अतिक्रमण निष्कासित करून अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेरचे अध्यक्ष- श्री. प्रविण थोरात यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभाग, नाशिक. तसेच मा. जिल्हाधिकारी सो. धुळे यांच्याकडे केली होती. 

त्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाने विस्तार अधिकारी पंचायत समिती साक्री यांनी दि.12- 4- 2023 रोजी भेट घेऊन चौकशी केली व वरील आदेश दिला.

 गायरान जमिनीवरील जमिनीबाबत मे. मुंबई उच्च न्यायालयाने दि. 6 ऑक्टोंबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी साहेबांना आदेश व निर्देश जारी केलेले आहेत, तसेच यापूर्वी मे. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 11 32/ 12 11 मध्ये दि. 28 -1- 2011 च्या निर्णयात म्हटले आहे की, गावठाण जागेवरील अतिक्रमणे (काही अपवाद वगळता) निष्कासित करावीत व भविष्यात अतिक्रमण होणार नाही.

याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी,असा आदेश देऊनही मे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही. तसेच याबाबत दि. 12 जुलै 2011 रोजी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. जमीन 03/ 2011 / प्र. क्रं./ 53/ज1 हा निर्गमित झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

पिंपळनेर ग्रामपंचायत हद्दीत पन्नास वर्षापासून गायरान व गावठाण जागेवर झालेले सदर अतिक्रमण ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच ,सदस्य, ग्रामसेवक ज्यांच्या कार्यकाळात झाले व त्यातून झालेल्या महाघोटाळ्याची चौकशी करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.मा. गटविकास अधिकारी सो.पंचायत समिती साक्री, यांनी दि.3 -4 -2023 च्या जा. क्र. पंससा /ग्रामपंचायत/ 1016/2023 च्या पत्रानुसार ग्रामपंचायत पिंपळनेर गावाची गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश काढला आहे.

 अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !