पेट्रोल पंपावर कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, थांबायचे किती पैसे घेतात?

पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी थांबणारे, कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, त्यांच्या जागेवर थांबायचे किती पैसे घेतात?


कंटेनर किंवा मोठ्या गाड्या यांच्याकडून पेट्रोल पंपवाले, 

हायवेवर हॉटेल आणि पेट्रोल पंप हि ट्रक कंटेनर छोटी मालवाहू वहाणे थांबण्याची ठिकाणे आहेत.
99.99% पेट्रोल पंप चालक किंवा तेथील कर्मचारी पैसे घेत नाहीत. फक्त त्यांच्याकडे एखादा दुसरा रात्रभर ड्युटी करणारा बिनपगारी वॉचमन असतो. रात्री ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी झोपल्यावर तो त्या थांबलेल्या वाहणांमधून कोणी डिझेल किंवा काही वस्तू चोरीला जाणार नाहीत.यासाठी रात्रभर पहारा देतो तसेच ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी झोपण्यापूर्वी तो वॉचमन सकाळी किती वाजता जाणार आहात तुम्हाला कधी उठवू असे विचारून घेतो आणि त्या वेळेस तो त्यांना उठवतो त्या बदल्यात ट्रक ड्रायव्हर त्याला पैसे देतात. असेच हॉटेल च्या परीसरात सुध्दा होते. पंपावर थांबणारे ट्रक हे शक्यतो अशाच पेट्रोल पंपावर थांबतात जिथे ते प्रवासात डिझेल भरतात. ट्रक ड्रायव्हरांची ची वेगवेगळ्या मार्गावर डिझेल भरायची ठिकाणे तसेच जेवायची हॉटेल ढाबे हे ठरलेली असतात. त्याप्रमाणे ते त्यांच्या प्रवासाचे नियोजन करतात.या बाबतीत ढाबा चालकांचे अर्थकारण थोडे वेगळे असते. तिथे सुध्दा ढाबा चालक मालकाला नाही तर वॉचमनला ट्रक ड्रायव्हर पैसे देतात.

हे ड्रायव्हर आणि त्याचे सहकारी त्या ढाब्यामध्ये हॉटेल मध्ये जेवायला सकाळी चहा नाश्ता करायला जातात. त्यातुन पैसे ढाबा तसेच हॉटेल चालकांना मिळतात. किंबहुना रात्रीची पार्कींगसाठी सुविधा असेल तरच ट्रक ड्रायव्हर त्या ढाब्यावर हॉटेल वर जेवायला थांबतात. जास्तीत जास्त ट्रक ड्रायवरांनी आपल्या हॉटेल, ढाब्यावर जेवायला थांबावे यासाठी ते हॉटेल, ढाबा चालक ट्रक ड्रायव्हरांना मोफत पार्किंग, बाथरूम टॉयलेट अशा प्रकारच्या सुविधा पुरवत असतात. जितकी पार्किंग साठी जागा जास्त तितका व्यवसाय जास्त हे समीकरणच बनले आहे. 


गुजरात मध्ये एका ढाबा चालकाने सुमारे एक हजार ट्रक पार्क होतील एवढी मोठी जागा ढाब्या च्या दोन्ही बाजूंनी आणि मागे भाड्याने घेतली आहे ढाब्याच्या एका बाजूने ट्रक आत जातात आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात संपुर्ण जागेला पत्रे लाऊन कंपाऊंड केले आहे तसेच हॉटेल वर एक मोठा एसी हॉल बनवला आहे. तीथे झोपण्यासाठी रात्रीसाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी फक्त शंभर रुपये माणसी एवढा अल्प दर घेत होते.

हेही वाचा : पेट्रोल पंपावरील सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार. लिंक .

जर तसेच ट्रक मध्ये दोघांना झोपता येईल अशी सोय कंपनीने किंवा ड्रायव्हर केबीन बनविणाऱ्या वर्कशॉपने केलेली असते परंतु बऱ्याच लांब मार्गावर वहातूक करणाऱ्या ट्रक मध्ये तिन जण असतात त्यामुळे एकाची झोपायची अडचण लक्षात घेऊन त्या ढाबा चालकाने टेरेस वर पत्रा टाकून त्यांची झोपायची मोफत सोय केली आहे.


हेही वाचा : Toll Plaza : टोल नाक्याच्या पावतीची किंमत समजुन घ्या. लिंक.

ज्यांना गरम पाणी अंघोळीला रुपयांना एक बादली उपलब्ध करून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हॉटेल ढाबा परीसरात पानपट्टी पंचरचे दुकान दुरुस्ती साठी गॅरेज ग्रिसींग करणारे तसेच स्पेअरपार्ट विक्रेते बघीतले असतील तेथे एक दवाखाना आणि त्याला लागून मेडिकल स्टोअर्स सुध्दा आहे. यासाठी मात्र त्या व्यवसाईकाच्या कल्पकतेची दाद द्यावी लागेल. 
ट्रक ड्रायव्हर क्लिनर ना प्रवासात काही आरोग्याच्या समस्या उद्भवतात हायवे कडेला वसलेल्या शहरात गावात अगदी रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर दवाखाने असतात परंतु ते माहीत नसतात त्यामुळे गाडी हायवे कडेला पार्क करून त्यांना दवाखाना शोधत फिरावे लागते. काही वेळा जनरल प्रॅक्टिसनर चा दवाखाना सापडला नाही किंवा जवळपास नाही म्हणून किरकोळ आजारासाठी स्पेशालिस्ट कडे जाऊन अवाच्या सव्वा केस पेपर फी भरून उपचार घ्यावा लागतो. 

धाबा चालकाने नातेवाईक डॉक्टरांना मोफत जागा आहे. 


हे ओळखून धाबा चालकाने एका नातेवाईक डॉक्टरांना दवाखान्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा दोघांनाही झाला आहे. तिथे जेवायला न थांबणारे ट्रक सुध्दा तिथे थांबू लागले आहेत. बरेच ट्रक ड्रायव्हर आज तब्येत बरी नाही तेंव्हा अजून काही वेळ गाडी चालवून आज तिथे जेवायला थांबू कारण तिथे दवाखाना आहे. असे विचार करून सुध्दा थांबणारे वाढले आहेत.


कालच मला एका ट्रक ड्रायव्हर कडून माहिती मिळाली लॉकडाउन १ पासून तेथील दवाखान्यात तपासणी फि घा्यायची बंद केली आहे फक्त औशधाचेच पैसे घेतले जातात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *