प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी सकाळी सुरू, दुपारनंतर डॉक्टर गायब रुग्ण वाऱ्यावर : पूर्णवेळ डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या नियुक्तीची मागणी रिअॅलिटी चेक
प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी सकाळी सुरू, दुपारनंतर डॉक्टर गायब |
धुळे : सर्व शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत बाह्यरुग्ण विभाग कार्यरत ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य आयुक्तांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात दुपारी चार ते सहा या वेळेत ओपीडी सुरू असतात का, याची पडताळणी विविध गावांच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन ‘पत्रकार ‘ प्रतिनिधींनी केली असता, अनेक ठिकाणी डॉक्टर गैरहजर दिसून आले. सकाळी साडेआठ ते दुपारी बारापर्यंत ओपीडी सुरू असते; मात्र दुपारनंतर डॉक्टर घरी निघून जात असल्याचे दिसून आले. यामुळे नागरिकांनी गावात आरोग्य केंद्र
सर्व शासकीय रुग्णालयात दोनवेळा ओपीडी |
सर्व शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत बाह्यरुग्ण विभाग कार्यरत ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य आयुक्तांनी जारी केले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओपीडीच्या वेळेस डॉक्टर उपस्थितीत असतात. त्याबाबत आदेशही दिले आहेत. मंगळवारी पोलिस संदर्भात धुळ्याला बैठक असल्यामुळे अनेक आरोग्य केंद्रातील डॉक्टर बैठक संपेपर्यंत धुळ्यात होते.
-डॉ. सचिन बोडके, जिल्हा आरोग्याधिकारी, जि. प. धुळे, असूनही शहरात उपचारासाठी यावे सांगितले. त्यामुळे नागरिकांची लागत असल्याचे नागरिकांनी हेळसांड थांबण्यासाठी पूर्णवेळ
सायंकाळीही ओपीडी OPD COMPLEX
■ शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्ये सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंत ओपीडी सुरू ठेवण्याचे आदेश राज्य आरोग्य आयुक्तांनी दिले आहेत.
■ तसेच सकाळनंतर सायंकाळी चार ते सहा यावेळेत देखील संबंधित आरोग्या- धिकाऱ्यांनी ओपीडी सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य आयुक्तांनी केल्या आहेत.
सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र झाले बंद
मालपूर आरोग्य केंद्र: पिंपळनेर : ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य केंद्राची ‘लोकमत’ प्रतिनिधीने सायंकाळी सव्वाचार वाजता पाहणी केली असता, डॉक्टर उपस्थित नव्हते. इतर कर्मचारी मात्र उपस्थित होते. तसेच याच ठिकाणच्या उपकेंद्राला मात्र कुलूप लागलेले दिसून आले.
येथील ग्रामीण रुग्णालयात ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, रुग्ण नसल्याने ओपीडी बंद असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे मृतांना शवविच्छेदनासाठी इतर ठिकाणी न्यावे लागत आहे. दरम्यान, कासारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले.
डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या नियुक्तीची मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष् देण्याची मागणी होत आहे.
Related News : बोगस डॉ. ची तक्रार कुठे करावी.