Mahadbt Scheme Plastic Mulching Paper : शेतकरी मित्रांनो, राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी Mahadbt अंतर्गत विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये कृषी विभाग योजनेमध्ये भाजीपाला व फळपिकासाठी देणारी एकमात्र योजना म्हणजे प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना आहे.
Mahadbt Scheme Plastic Mulching Paper: राज्य शासन कृषी विभाग माध्यमातून शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं. आम्ही या लेखाच्या माध्यमातून, Plastic Mulching Paper Yojana काय आहे ? अनुदान किती दिलं जातं ? कागदपत्रे कोणकोणते लागणर? पात्रता काय ? आहे. अर्ज कसा करावा ? इत्यादी संपूर्ण माहिती.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना काय आहे ? : What is Plastic Mulching Paper Subsidy Scheme?
प्लॅस्टिक मल्चिंग पेपर ही एक खास शेती करण्यास परिपूर्ण मदत करून संरक्षणात्मक अडथळा निर्माण करून मातीच्या पृष्ठभागावर ठेऊन भाजीपाला व फळपिकाची लागवड करता येते. Plastic Mulching Paper हि रात्रीच्या वेळी माती गरम ठेवते आणि दिवसा थंड ठेवते. म्हणून वापरली जाते. महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपर चा वापर केला जातो, या अनुषंगाने राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना Mahadbt पोर्टलच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.
♦️ हे पण वाचा :
भाजीपाला व फळझाडांसाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपर असल्यास पाण्यामुळे होणारा बाष्पीभवनाचा त्रास कमी होतो, भाजीपाला आणि फळझाडांसाठी पिकावरील कीड, रोगराई पासून पिकांचे संरक्षण होते, त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असतो.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना पेपर पात्रता : Plastic Mulching Paper Subsidy Scheme Paper Eligibility
शेतकऱ्यांचा पीक उत्पादनास चालना देण्याची क्षमता प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी वाढता वापर पाहता शासनाकडून प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी 50% अनुदान दिलं जात. सामान्यता प्रति हेक्टरी 32 हजार खर्च प्लास्टिक मल्चिंग पेपरचा खर्च इतका येतो. यासाठी राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत शासनाकडून 50% अनुदान दिले जातं, म्हणजेच जवळपास 16 हजार रुपये प्रति हेक्टरसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मर्यादा ही दोन हेक्टरपर्यंत ठरविण्यात आलेली आहे. राज्याच्या डोंगराळ, दुर्गम भागासाठी वाढीव खर्च 36,800 रुपये. याप्रमाणे 50% अनुदान त्या भागातील शेतकऱ्यांना दिला जातो. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट,वैयक्तिक शेतकरी, शेतकरी समूह, इत्यादींना अर्थसाह्य केलं जातं.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना संपूर्ण नाव : Plastic Mulching Paper Scheme Full Name
- विभाग : कृषी विभाग
- लाभार्थी राज्य : महाराष्ट्र
- लाभार्थी वर्ग : शेतकरी राजा
- लाभ रक्कम : 50% अनुदान
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
प्लास्टिक मल्चिंग पेपर पीकनिहाय जाडी : Plastic Mulching Paper Crop wise Thickness
प्लास्टिक मल्चिंग पेपरची जाडी ही साधारणतः पिकाच्या कालावधीनुसार ठरविण्यात येते. विविध भाजीपाल्यांसाठी,फळ पिकांसाठी, ही जाडी वेगवेगळी असू शकते. मल्चिंग पेपरची जाडी कालावधीनुसार खालील प्रमाणे पाहू शकता.
- 25 मायक्राँन : 3-4 महिना पीक कालावधी :
- 50 मायक्राँन : 4-12 महिना पीक कालावधी :
- 100 किंवा 200 मायक्राँन : 12 महिन्यावरील पीक कालावधी :
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे : Documents required for Plastic Mulching Paper Subsidy Scheme Application
- आधार कार्ड.
- बँक पासबुक
- जमिनीचा ७/१२
- ८अ उतारा.
- अनुसूचित जाती/जमाती चा दाखला. असल्यास
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा ? : Mahadbt scheme plastic mulching paper apply online
- सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन नवीन नोंदणी करावे.
- Plastic Mulching Paper Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती जायचं आहे.
- महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर नोंदणी करताना तुम्ही टाकलेला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- फलोत्पादन या पर्यायासमोरील बाबी निवडा.
- या बटणावर क्लिक करून त्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर हा पर्याय शोधून निवडा.
- त्यानंतर तुम्हाला जितक्या क्षेत्रावरती मल्चिंग हवा आहे.
- तो क्षेत्र टाकून अर्ज जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त योजनासाठी अर्ज केला असेल,
- तर त्यामध्ये प्राधान्य निवडा प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर सर्वात शेवटी अर्ज सादर करा.
- तुम्ही जर या घटकांतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल
- तर त्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतकी पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल.
- अशाप्रकारे एकदम सोप्यापद्धतीने आहे.
- तुम्ही ऑनलाईन घरबसल्या प्लास्टिक मल्चिंग पेपर योजनेसाठी अर्ज करू शकता
- या योजनेअंतर्गत 50 टक्यापर्यंत अनुदान मिळवू शकता.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती आहे? : How much is the plastic mulching paper subsidy?
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 32 हजार खर्च अपेक्षित असून, 50 टक्के अनुदान दिले जात, प्रतिहेक्टर 16 हजार रुपयांपर्यंत देखील कमाल मर्यादा अनुदान आहे.
प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान निवड झाल्यानंतर अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे कोणती? :What are the required documents to be uploaded after the plastic mulching paper grant selection?
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्यावत ७/१२
- तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्यावत ८ अ
- ७/१२ वर फलोत्पादन पिकांची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकांची स्वंयघोषणा पेरा प्रमाणपत्र .
- चतु :सीमा नकाशा
- वैध प्रमाणपत्र ( अनु -जाती /जमाती शेतकर्यांसाठी )
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे प्रमाणत्र.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो.
Related Notification Information Pdf : | Click Here |
Official Website Information Link : | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |