बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील विद्यमान ग्रामसेवक सतीष नानाभाऊ भामरे यांची ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज ची माहिती देण्यास हेतुपूर्वक करतात टाळाटाळ.
मुद्दा क्रं १) जलजीवन मिशन योजने अंतर्गत बलकुवे ग्रामपंचायत ला मिळालेली निधी.
२)सदर कामाचा कार्याआरंभ आदेश ची प्रत व ईस्टेमेट
३) त्या कामाचे ठेकेदार चे नाव
४) जलजीवन योजने अंतर्गत खर्च करण्यात आलेली निधी.
५) संबंधित योजने अंतर्गत ज्या लोकांना घराला नळ जोडणी करण्यात आली आहे त्यांची नावाची यादी ६)काम पुर्ण केल्याचा दाखला.
अशी माहिती मागीतली होती तरी ग्रामसेवक यांनी ती माहिती चे कागदपत्र साक्षांकित करून माहिती अधिकार चा लोगो सहीत माहिती मागीतली होती.
तरी त्यांनी हेतुपूर्वक चुकीची व अपुर्ण माहिती पुरवली होती त्यामुळे मी दिनांक 07/09/2022 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर येथे माहिती अधिकार कायदा 2005 चे कलम 19/1 नुसार प्रथम अपील दाखल केले त्याची सुनावणी दिनांक 10/10/2022 रोजी झाली.
त्यात प्रथम अपिलीय अधिकारी यांनी मुद्दा क्रं 3 ते 6 याची माहिती 15 दिवसात पुरवण्याचे आदेश दिले.परंतु ग्रामसेवक यांनी प्रथम अपीलीय अधिकारी यांचे आदेशाला ठेंगा दाखवत व ग्रामपंचायत बलकुवे येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी आज पर्यंत माहिती पुरवली नाही.
The information. | अर्ज केलेला पुरावा. |
म्हणुन मी दिनांक 05/12/2022 रोजी मा राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक येथे द्वितीय अपील दाखल केले आहे. पुढील कार्यवाही आयोग करतील परंतु बहुतेक ग्रामसेवक हे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकार कायदा ची पायमल्ली करत आहेत हे सिद्ध होते.