बलकुवे ग्रामपंचायत मध्ये आर्थिक भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकार, ची माहिती देण्यास टाळाटाळ.

बलकुवे ता. शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामसेवक एस .एन .भामरे यांनी बलकुवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात  झालेल्या आर्थिक भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज ची माहिती देण्यास हेतुपूर्वक टाळाटाळ .ग्रामपंचायत कार्यालयात  झालेल्या आर्थिक भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज ची माहिती देण्यास हेतुपूर्वक टाळाटाळ


माहिती अधिकार अर्ज करुन मागीतलेली माहिती.

 १)बलकुवे येथील जानेवारी सन 2021 ते सन 20 जानेवारी सन 2022 पर्यत एका वर्षात झालेल्या छप्पन्न लाखाच्या (5600000,) रुपये ची कामाची तक्रार संबधीत दप्तर उपलब्ध असताना चौकशी अधिकारी यांना चौकशीसाठी दप्तर उपलब्ध करून दिले नाही मा गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांनी दिलेला चौकशी अहवाल नुसार .

२) बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील घरपट्टी व पाणीपट्टी ची जमा झालेली ग्रामनिधी,तसेच त्याचे बैंक पासबुक, जनतेला दिलेल्या पावती चे झेरॉक्स प्रती. 

३) पेसा योजनेत बलकुवे ग्रामपंचायत ला मिळालेली निधी व त्यातुन करण्यात आलेली कामे व खर्च करण्यात आलेली निधी .

४) बलकुवे येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत सहा लाख अठ्ठावीस हजार (628000,)  रुपये खर्च दाखवला परंतु जलजीवन योजनेत अंतर्गत किती लोकांना नवीन नळ जोडणी देण्यात आली याची नावांची यादी देण्यात आली नाही.

५)  ग्रामपंचायत सदस्य यांनी दरमहा घेतलेल्या मासिक मिटींग चे इतीव्रुत ची माहिती.

६) ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभा चे इतीव्रुत ची माहिती.

७) राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांचे आदेशानुसार ची माहिती.

८) ग्रामपंचायत बलकुवे यांचे अधिकार क्षेत्रातील पाटबंधारे मुखेड येथील मासे संवर्धन व मासेमारी चा ठेका रद्द. करण्यासाठी चा व नवीन ठेका देण्यासाठी ग्रामसभेचा ठराव प्रत.

९) ग्रामपंचायत बलकुवे येथील सर्व बैंक चे पासबुक ची माहिती .

१०) बलकुवे येथील  स्वच्छ भारत मिशन व पाणी पुरवठा विभागामार्फत मंजुर सांडपाणी साठी चे शोष खड्डे ची माहिती .


माहिती अधिकार कायदा चे कलम 7/1 .

अशी अनेक माहिती अधिकार अर्ज ची माहिती आज पर्यंत ग्रामसेवक एस एन भामरे यांनी माहिती अधिकार कायदा चे कलम 7/1 नुसार तिस दिवसात देणे बंधनकारक आहे परंतु माहिती न दिल्याने व प्रथम  अपीलीय अधिकारी  यांचा आदेशाला ठेंगा दाखवत आज पर्यंत कोणतीही माहिती पुरवली नाही.

ग्रामपंचायत मध्ये झालेल्या आर्थीक भ्रष्टाचार.

तरी ग्रामपंचायत बलकुवे येथील झालेल्या आर्थीक भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती दिली नाही तरी भ्रष्टाचार झाला नसेल तर माहिती देण्यास टाळाटाळ का ॽ तरी काही भ्रष्ट लोक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना ब्लेक मेल करणारे म्हणतात व त्यांना ब्लेक लिस्ट करा अशी मागणी करतात परंतु ब्लेक मेल तोच होतो जो ब्लेक करतो प्रामाणिक माणूस ब्लेक होऊच शकत नाही व कोणीही करू शकत नाही तरी माझे बलकुवे येथील ग्रामसेवक एस एन भामरे यांना खुल्ले चेलेंज आहे कि आम्ही मागीतलेली माहिती अधिकार अर्ज ची माहिती देऊन तर बघा 

माधवराव फुलचंद दोरीक 

मु. पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे

(माहिती अधिकार कार्यकर्ता) 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *