बाजार समितीचा रणसंग्राम रंगणार |माघारीसाठी लागणार सर्व नेत्यांचा ‘कस’ !

चार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची परिस्थिती.

ग्रामीण बातम्या : धुळे सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ७२ जागांसाठी तब्बल ७२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माघारीसाठी दोन फक्त दोन दिवसाची मुदत आहे. त्यामुळे आता माघारीसाठी सर्वच नेत्याचा कस लागणार आहे.


मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणात घडलेल्या घडामोडीनंतर आता बाजार समितीची निवडणुकीही रंगतदार होणार असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. सर्वपक्षीय नेते आपल्याकडे बाजार समितीची सत्ता यावी यासाठी धडपडत आहेत. 

तालुक्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती सहकार अनेकांची डोकेदुखी वाढली क्षेत्रात प्रतिष्ठेची समजली जाते. बाजार समितीच्या संचालक पदावर आरुड होण्यासाठी नव्या दमाचे उत्साही कार्यकर्ते पुढे येताना दिसून येत आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घालून दिलेल्या अटीने बाजार समितीची निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.

असे असलेतरी सध्या बाजार समितीच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय, सहकारी क्षेत्रातील सर्वपक्षीय नेते सध्या कामाला लागले आहेत. दोन दिवसात किती माघार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीचा रणसंग्राम रंगणार

राजकीय पक्षांनी उमेदवारीची चाचपणी करून बाजार समितीवर सत्ता काबीज करण्यासाठी सक्रीय कार्यकर्ते कोणतीही कसर सोडणार नाहीत, अनेक कार्यकर्त्यांना संचालक पदाचे डोहाळे लागल्याचे दिसून येत आहेत. राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याने बाजार समित्यांची रणसंग्राम चांगलाच रंगणार आहे.

निर्वाचन

• जिल्ह्यातील ७२९ इच्छूक उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातून कोण माघार घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनेकांची प्रतिष्ठा पणाला……

बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील वातावरण सध्या चांगलेच तापेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याभरात विविध पक्षांकडून मोर्चेबांधणी करुन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सत्तेसाठी नवनवे डाव आखले जावू शकतात. धुळ्यासह अन्य बाजार समित्यांची निवडणूक चुरशीची होणार असे दिसून येत आहे.

उमेदवारी अर्ज भरताना प्राधीकरणाने घालुन दिलेल्या अटीने अनेकांची डोकेदुखी वाढली होती. आजवर रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयाचे चालत होते. यावेळी तलाठीचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी नामांकन सादर करताना राखीव जागेशिवाय अन्य उमेदवारांसाठी ५ हजार रुपये तसेच राखीव जागेवरील उमेदवारांसाठी १ हजार रुपये अनामत ठेव म्हणून भरणा करावा लागला.

यांच्याकडे आहे जिल्ह्याचे लक्ष.

• धुळ्यातून महादेव परदेशी, जितेंद्र कापडणेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र शेलार, दरबारसिंग गिरासे, लक्ष्मीकांत बोढरे आदी.

• शिरपूरमधून कांतीलाल दगा पाटील, डॉ. किरण गुजराथी, आनंदसिंग राऊळ, . शांतीलाल जमादार, मोहन पावर, राजधर पाटील आदी. 

• शिंदखेडामधून प्रकाश भगवान पाटील, सुनील लांडगे, महेंद्र देसले, रविंद्र माळी, चंद्रकांत पाटील, जयवंतराव बोरसे, महेंद्र पाटील आदी.

साक्रीमधून हंसराज पाटील, राहुल पगारे, संजय साबळे, सचिन सोनवणे, बन्सीलाल बाविस्कर, दीपक साळुंके, विनायक अकलाडे आदी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *